उन्हाळ्यात अनेक लोक थंडगार पदार्थ खायला प्राधान्य देतात काहींना तर आईस्क्रिम खूप आवडते. थंडगार आईस्क्रिम व अन्य थंड पदार्थ खूप पसंत पडत असतात. दुकानांत व रस्त्यांवर फिरून आईस्क्रीम विकणाऱ्यांकडून ऑरेंज आईस्क्रिम लहान मुले मोठ्या आवडीने खात असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपल्या मुलांच्या आरोग्याची चिंता सतावू लागेल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अस्वच्छ वातावरणात तयार केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे होण्याऱ्या धोक्यांबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्राम हँडल humbifoodie वर शेअर करण्यात आला आहे. सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ कानपूरमधील एका आईस्क्रिम पार्लरमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ऑरेंज आईस्क्रिम बनताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आधी बादलीत ठेवलेले संत्र्याचे पाणी ठेऊन ते साच्यात ओततो. त्यानंतर यामध्ये दूध मिसळतो व ते फ्रीजरमध्ये ठेवतो. ते घठ्ठ झाल्यानंतर सर्व आईस्क्रिम बाहेर काढले जाते व कंटेनर्समध्ये पॅक केले जाते. आईस्क्रिम बनवण्याच्या प्रक्रियेत स्वच्छतेकडे दुर्घक्ष करण्यात आले आहे.
अशा प्रकारे बनवलेली आईस्क्रिम सर्वत्र विकली जाते. याची किंमत केवळ १० रुपये असते. या व्हायरल व्हिडिओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. वृत्त लिहीपर्यंतया व्हिडिओला १.२ लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्संमध्ये खळबळ माजली आहे. एका यूजरने लिहिले की, मला वाटत आहे की, लहानपणापासून अशा प्रकारची आईस्क्रिम खालल्यामुळे माझी रोग प्रतिरोधक क्षमता वाढली आहे. दूसऱ्या यूजरने लिहिले की, आता मी स्थानिक आईस्क्रिम कधीही खाणार नाही. एका अन्य यूजरने व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, तेथे साफ-सफाईसारखी कोणती गोष्ट नाही.
कॅनडामध्ये चालक आणि महिला प्रवासी यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोघांमधील हे संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कॅब ड्रायव्हर महिलेला सांगतो की जर ती पाकिस्तानात असती तर त्याने स्वतःच तिचे अपहरण केले असते. चालक हा मूळचा पाकिस्तानचा असल्याचे समजते.
संबंधित बातम्या