Lok Sabha Elections 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने संविधान, आरक्षण आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान केले, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. संविधान आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी हे मतदान करण्यात आले. सामाजिक न्यायासाठी खुला झालेला मार्ग या मार्गाचा अवलंब करून नेताजींचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल, असे त्यांनी कन्नौज येथे विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजपची प्रगती रोखणे हे समाजवादी पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. नव्या आशेने आणि अपेक्षेने जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. मी त्यांना सलाम करतो, असे सपा प्रमुख म्हणाले.
भाजप सरकार स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा संख्याबळाचा विषय आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, जनतेने नकारात्मक राजकारण नाकारले आहे. हे मतदान नकारात्मक राजकारणाच्या विरोधात आणि सकारात्मक राजकारण, सामाजिक न्याय, लोकशाहीचे रक्षण, आरक्षण जतन आणि घटनेत सुधारणा करण्यासाठी होते आणि भाजपने नेहमीच या मूल्यांचे नुकसान केले आहे.
मी कन्नौजच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, समाजवाद्यांनी येथे सुरू केलेली विकासाची गती आम्ही कायम ठेवू. अखिलेश यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या सुब्रत पाठक यांचा १ लाख ६० हजार ९२२ मतांनी पराभव केला. जिल्हाधिकारी शुभ्रंत शुक्ला यांच्याकडून विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी अखिलेश आले असता त्यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत निकालानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ५४३ पैकी २४० जागा जिंकल्या. परंतु, बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे. सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या होत्या. तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी ३०३ जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकल्या, ज्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त आहेत. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळवता होता. काँग्रेसचा मित्रपक्षांपैकी एक समाजवादी पक्षाने यंदा उत्तर प्रदेशात ३७ जागा जिंकल्या आहेत. पश्चिम बंगाल राज्यात अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने २९ आणि दक्षिण तामिळनाडू राज्यात द्रविड मुनेत्र कळघमने २२ जागा जिंकल्या आहेत. इंडिया आघाडीने एकूण २३२ जागा जिंकल्या आहेत. यूपीए सरकारच्या यशात राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेचा सिंहाचा वाटा आहे, मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
संबंधित बातम्या