गुजरातमध्ये सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. गुजरातमध्ये एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. कथित भ्रष्ट अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी नागरिक सरकारी कार्यालयात गेले. ‘लाच देणे आणि घेणे दोन्ही गोष्टी गुन्हा आहे’ अशा आशयाचे फलक लोकांनी गळ्यात लटकवले होते. या आशयाच्या घोषणा देत नागरिकांनी चक्क त्याच्या अंगावर नोटा फेकल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये हा सरकारी अधिकारी हात जोडून खुर्चीवर बसलेला दिसतो. तर लोक त्याच्यावर गुजराती भाषेत लाच घेतल्याचा आरोप करत असल्याचं ऐकू येतं. या आंदोलकांनी नोटांचे बंडल सोबत आणले होते. अशाप्रकारे त्या अधिकाऱ्यावर नोटा फेकून नागरिकांनी आपला संताप आणि नाराजी व्यक्त केली.
'कलाम की छोट' नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘घ्या! गैरमार्गाने कमावलेले किती पैसे तुम्ही खाणार आहात? आता जनतेने त्याच भाषेत उत्तर दिले आहे. आता अधिकाऱ्यांनी काय करावे? नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी किती लाच दिली असणार? आता ते आपल्या बॉसला (वरिष्ठ अधिकाऱ्यांना) पैसे देत असतील का?’ असं संभाषण या व्हिडिओत ऐकू येतं. या व्हायरल व्हिडिओला पोस्ट झाल्यानंतर ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडिओखाली एका यूजरने लिहिले, ‘भ्रष्टाचाराचा कर्करोग आता महामारीसारखा पसरला आहे. @narendramodi यांनी हा कॅन्सर संपवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्यांनी काहीच केलेले नाही.’
‘भारतात भाजप असो वा बिगर-भाजप सरकार, शिपाईंपासून वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांपर्यंत सर्व सरकारी कर्मचारी भ्रष्ट आहेत. त्यांची ‘अर्थव्यवस्था’ मात्र वेगाने वाढत आहे. पोलीस असो वा महामंडळ किंवा महसूल विभाग असो कोणत्याही विभागातील सरकारी कर्मचारी…’
आणखी एका यूजरने कमेंट केलीय, ‘आपल्या देशात भ्रष्टाचार सामान्य झाला आहे. सरकारी अधिकाऱ्यांची लाज वाटते.’
हा व्हिडिओ यूपीएससी, एसएससी, पोलिस उमेदवारांसाठी खरी प्रेरणा आहे. कोचिंग सेंटरवाले हा व्हिडिओ दाखवतील आणि म्हणतील, ‘पंतप्रधानांची इच्छा असली तरी तुम्हाला नोकरीवरून हटवले जाणार नाही. लाचखोरी, मुजोर किंवा रॅप*सारखे गुन्हे केले तरी सरकारी कर्मचाऱ्याची नोकरी कायमस्वरूपी असते.’
तर एका संतप्त युजरने लिहिले आहे, ‘खूप चांगलं काम.. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना अशीच वागणूक मिळायला हवी होती.’
संबंधित बातम्या