मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : रामनवमीला मोठी दुर्घटना! मंदिरातील विहिरीत पडलेल्या १३ जणांचा मृत्यू, १७ जणांना वाचवण्यात यश
रामनवमीला मोठी दुर्घटना
रामनवमीला मोठी दुर्घटना

VIDEO : रामनवमीला मोठी दुर्घटना! मंदिरातील विहिरीत पडलेल्या १३ जणांचा मृत्यू, १७ जणांना वाचवण्यात यश

30 March 2023, 17:28 ISTShrikant Ashok Londhe

People fall in well in temple : इंदूर शहरातील बेलेश्वर मंदिरातील जुन्बाया विहिरीचे छत कोसळल्याने त्यावर उभे असलेले जवळपास ३० लोक विहिरीत पडले. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. शहरातील पटेल नगर येथील बेलेश्वर मंदिरात बावडी (विहिर) चे छत कोसळल्याने अनेक लोक विहिरीत कोसळले. विहिरीत पडलेल्या १३ लोकांचा मृत्यू झाला असून १७ जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. सांगितले जात आहे की, विहिरीची खोली जवळपास ५० फुटाहून अधिक आहे. ३० हून अधिक लोक आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. दोरीच्या सहाय्याने १७ लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रामनवमीच्या निमित्त बेलेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या दरम्यान जुन्या विहिरीचे छत कोसळल्याने त्यामध्ये दोन डझनहून अधिक लोक विहिरीत पडले.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मंदिरातील पुरातन विहिरीच्या छतावर लोकांची गर्दी जमा झाली होता. लोकांचे ओझे न पेलल्याने छत विहिरीत कोसळले.

या दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला आहे. ज्या १७ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या प्रकरणाची माहिती घेत भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत.

 

शिवराज सिंह चौहान यांनी न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना म्हटले की, प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १७ लोकांना बाहेर काढले असून अजूनही काही लोक विहिरीत अडकले आहेत.