Nagpur Lifetime Panipuri News: नागपूर येथील एका पाणीपुरीवाल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या पाणीपुरी विक्रेत्याने आपल्या ग्राहकांसाठी आगळीवेगळी ऑफर आणली आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ही ऑफर अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड पाणीपुरी खायला मिळणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना एकदाच ९९ हजार रुपये भरावे लागणार आहे. अनेकजण या पाणीपुरीवाल्याच्या मार्केटींग आयडियाचे कौतूक करत आहेत.
नागपूर येथील तिसऱ्या पिढीतील पाणीपुरी विक्रेते विजय मेवालाल गुप्ता यांनी लोकप्रिय स्ट्रीट स्नॅक विकण्यासाठी ही अनोखी ऑफर आणली आहे, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अनलिमिटेड पाणीपुरी खाण्यासाठी ग्राहकाला एकरकमी ९९ हजार रुपये द्यावे लागणार आहे. यासाठी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात कायदेशीर करार केला जाईल, असेही सांगितले जाते. तसेच महिला आणि मुलींसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.
व्हायरल ऑफरमुळे अनेक पाणीपुरीप्रेमींनी आपले कॅल्क्युलेटर उचलले आणि हा सौदा विक्रेत्याला फायदेशीर आहे की ग्राहकाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्याच्या मार्केटिंग कौशल्याचे कौतुक केले. तर, काहींनी पाणीपुरीसाठी आकारल्या जाणाऱ्या हास्यास्पद रकमेची खिल्ली उडवली.
या पाणीपुरीवाल्याबद्दल माहिती सोशल मीडियावर पसरताच नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, ही ऑफर ग्राहकांच्या आयुष्यासाठी आहे की दुकानदारांच्या? असे प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, जर तुम्ही दररोज १० रुपयांची प्लेट खात असाल तर, २७ वर्षे दररोज पाणीपुरी खाऊ शकतात. अनेकांनी या ऑफरच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ग्राहक मिळवण्यासाठी ही नौटंकी असल्याचे म्हटले. पार्सल उपलब्ध आहे का? रोज ५०० पुरी खरेदी करून १०० ग्राहकांना विकणार आहे,' अशी गंमत एकाने व्यक्त केली. काहींनी पर्यायही सुचवले. बँकेत ९९ हजार रुपयांची मुदत ठेव करा आणि दररोज २५ रुपये व्याज मिळवा, असे एकाने सांगितले.
संबंधित बातम्या