Patna Opposition Meeting : "अजूनही वेळ गेलेली नाही लग्न करा, आम्ही..."; राहुल गांधींना लालूंचा सल्ला, VIDEO
Lalu Yadav on Rahul Gandhi marriage : लालू यादवयांनीकाँग्रेस नेते राहुल गांधीयांना म्हटले की, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे लवकरच लग्न करावे.
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे अध्यक्ष लालू यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना म्हटले की, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे लवकरच लग्न करावे. लालू यादव म्हणाले की, राहुल गांधींनी लग्न केल्यास ते वऱ्हाडी म्हणून लग्नात सामील होतील. विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधींशी संवाद साधताना लालू प्रसाद म्हणाले की, दाढी वाढवू नका, लग्न करा. तुमची आई (सोनिया गांधी) म्हणत होत्या की, राहुल माझे ऐकत नाही. तुम्हीच त्याला लग्नास तयार करा. लालू म्हणाले की, तुम्ही माझे ऐका लग्न करा. यावर तेथे उपस्थित लोकांमध्ये एक हशा पिकला.राहुल गांधींनीही लालू यादव यांना उत्तर दिले मात्र गोंधळामुळे माध्यमांपर्यंत ते ऐकू आले नाही.
ट्रेंडिंग न्यूज
लालू यादव पत्रकार परिषदेत आपले मत मांडत असताना नितीश कुमार यांनी त्यांना मध्येच थांबवत राहुल गांधी यांनी पुन्हा दाढी वाढल्याचे सांगितले. राहुल गांधींची भारत जोडो यात्रेदरम्यान दाढी खूप वाढली होती. त्यानंतर ती कापली होती. पाटण्यातील बैठकीत राहुल यांची दाढी पुन्हा वाढल्याचे दिसले. नीतीश यांनी हे लक्षात आणून देताच लालू म्हणाले-"फिरत असताना दाढी वाढवली आता पार खालीपर्यंत वाढवू नका. माहित नाही की, नरेंद्र मोदी सगळी दाढी का कापन नाहीत. नितीश यांचाही सल्ला आहे की, दाढी छोटी करा. तुम्ही आमचा सल्ला मानून लग्न केले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. लग्न करा आम्ही वऱ्हाडी बनून चालू.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पाटण्यात आज विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली.यावेळी मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी मोदी विरोधकांची वज्रमूठ पाहायला मिळाली. बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पत्रकार परिषेदत म्हटले की, सर्वांनी एकत लढण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यावेळी जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीसाठी देशभरातील १५ विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. यात ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल. भगवंत मान, एमके स्टॅलिन यांच्यासहित सहा राज्यांचे मुख्यमंत्री,तसंच उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, महबूबा मुफ्ती यांच्यासहित ५ राज्यांचे माजी मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी देखील बैठकीला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे आजारातून बरं झाल्यानंतर लालू प्रसाद यादव पहिल्यांदाच या बैठकीत सहभागी झाले.