Patient-Doctor Love : मध्यप्रदेश राज्यातील इंदुर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एमवाय रुग्णालयात एका ६५ वर्षाच्या रुग्णाचा जीव २५ वर्षाच्या डॉक्टरवर जडला. इतकेच नाही तर त्यांनी एक प्रेमपत्र लिहून तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यामुळे वैतागलेल्या महिला डॉक्टरने संयोगितागंज पोलीस ठाणे गाठून या प्रेमवीराविरोधात तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या म्हातार चाळ करणाऱ्या या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. सलाउद्दीन खान असे आरोपीचे नाव आहे. सलाउद्दीन आजारी होता. उपचारासाठी ते काही दिवसांपूर्वी एमवाय रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांच्यावर एका २५ वर्षांच्या तरुण महिला डॉक्टरने उपचार केले होते. सलाउद्दीन खान यांना महिला डॉक्टरविषयी आकर्षण वाटू लागलं. तो बहाणे बनवून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत उपचार करत राहिली. मात्र एकेदिवशी या रुग्णाने हद्द पार करत आरोपीने महिला डॉक्टरला प्रेमपत्र पाठवून लग्न करण्याची मागणी केली. त्याच्या सततच्या चाळ्याला वैतागून महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी वृद्ध महिला डॉक्टरला सतत त्रास देत होता. त्याने महिलेला लग्नाचीही मागणी घातली होती. आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यापासून आरोपी महिला डॉक्टरच्या मागे लागला होता. सतत तो तिला त्रास देत होता.
एके दिवशी आरोपीने महिला डॉक्टरला लव लेटर लिहून लग्नाचा प्रस्ताव दिला. त्याने मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये हे लव्ह लेटर लिहिले आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
टिकटॉक इन्फ्लुएंसर क्लीन गर्लने एका बेवारस कबरीची साफसफाई केल्यानंतर सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कबरीचे ठिकाण न सांगता तिने पाहिलेली ही सर्वात घाणेरडी कबर असल्याचा दावा या महिलेने केला आहे.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही सर्वांनी ते पाहिले का, की मी बग्गीन आहे".
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते, "मी रात्री स्मशानभूमीत ही बेवारस कबर फुकट साफ करत असते. माझ्या डोक्यात अनेक प्रश्न आहेत - काय झालं? ही कबर इतकी घाणेरडी कशी झाली? इथे कोण दफन आहे?"
संबंधित बातम्या