इंडिगो फ्लाइटमध्ये बॉलिवूड फिल्म टाइप प्रपोजल पाहायला मिळाले. येथे रोमांटिक अंदाजात एका तरुणीने विमानातच फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नाचे प्रस्ताव एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतात. अनेकदा लोक भव्य आणि खास पद्धतीने प्रपोज करण्याचा प्लॅनही करतात. इन्स्टाग्राम युजर ऐश्वर्या बन्सलने आपले प्रेम व्यक्त करत इंडिगोच्या विमानात बॉयफ्रेंडला प्रपोज केले. बन्सल यांनी विमानाने टेक ऑफ केल्यानंतर विमानातील मधल्या जागेत अंगठी घेऊन गुडघ्यावर बसून आपल्या प्रियकराला प्रपोज केले तसेच याचा व्हिडिओही शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये बन्सल आणि तिचा बॉयफ्रेंड अमूल्य गोयल विमानात चढताना दिसत आहेत. त्यानंतर बन्सल गोयलच्या दिशेने जाते. फ्लाइट अटेंडंट या जोडप्यासाठी घोषणा करत असते. तरुणी प्रियकराजवळ पोहोचताच इतर ४ प्रवाशी एक कागद हातात घेतात, ज्यावर लिहिले आहे, "तू माझ्याशी लग्न करशील का?
त्यानंतर ती महिला आपले प्रेम व्यक्त करते आणि अंगठी त्याच्या बोटावर ठेवते. व्हिडिओ शेअर करताना पोस्टच्या कॅप्शनमध्ये बन्सल यांनी लिहिले की, "ओएमजी, मला ज्या प्रकारे वाटले ते त्यापेक्षा चांगले आहे. मला त्याला काही तरी अनोख्या पद्धतीने सरप्राईज द्यायचं होतं आणि अचानक हा विचार माझ्या डोक्यात आला. मला खात्री नव्हती की क्रू परवानगी देईल की नाही, परंतु आता काय झाले हे आपल्याला माहित आहे."
ही पोस्ट २६ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला असंख्य लाईक्स आणि कमेंट्सही आल्या आहेत.
एका व्यक्तीने लिहिले, "हे किती गोड आहे."
आणखी एका व्यक्तीने शेअर केले की, मीही अशा प्रकारच्या प्रस्तावाला पात्र आहे.
हिना वकास या युजरने कमेंट केली आहे की, जर असं असेल तर मी माझ्या नवऱ्याला पुन्हा एकदा लग्नासाठी प्रपोज करू शकते.
चौथ्या युजरने म्हटले की, "कृपया, तुम्ही इंडिगोला अशी विनंती कशी केली तशी तुम्ही मला मदत कराल का? यामागची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.