Viral Video: उडत्या विमानाचा दरवाजा उघडणाऱ्या तरुणाला इतर प्रवाशांनी धू-धू धुतलं, व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: उडत्या विमानाचा दरवाजा उघडणाऱ्या तरुणाला इतर प्रवाशांनी धू-धू धुतलं, व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: उडत्या विमानाचा दरवाजा उघडणाऱ्या तरुणाला इतर प्रवाशांनी धू-धू धुतलं, व्हिडिओ व्हायरल!

Nov 07, 2024 04:14 PM IST

Copa Airlines Flight Viral Video: हजारो फूट उंचीवरून उडणाऱ्या विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून बेदम मारहाण केली.

उडत्या विमानाचा दरवाजा उघडणाऱ्या तरुणाला इतर प्रवाशांनी धू-धू धुतलं, व्हिडिओ व्हायरल!
उडत्या विमानाचा दरवाजा उघडणाऱ्या तरुणाला इतर प्रवाशांनी धू-धू धुतलं, व्हिडिओ व्हायरल!

Viral News: हजारो फूट उंचीवर उड्डाण करताना विमानाचे दरवाजे उघडल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता अशीच एक बातमी समोर येत आहे. एका प्रवाशाने उडत्या विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर संतापलेल्या प्रवाशांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दक्षिण अमेरिकेतील आहे. विमान हवेत असतानाच एका तरुणाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेक प्रवाशांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पंरतु, तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. यावर संतापलेल्या इतर प्रवासांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला चोप दिला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ही घटना मंगळवारी (५ नोव्हेंबर २०२४) सकाळी कोपा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये घडली, असे न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे. हे विमान ब्राझिलिया, ब्राझील येथून पनामा सिटीला जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान उतरण्यापूर्वीच विमानात हाणामारी सुरू झाली. एका प्रवाशाने विमानात ठेवलेल्या कटलरीतून प्लास्टिकचा चाकू काढला आणि फ्लाइट अटेंडंटला बंदी बनवण्याचा प्रयत्न केला.

यानंतर काही वेळातच त्याने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोक घाबरले. प्रवाशांनी आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी मिळून आधी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. नंतर संतापलेल्या इतर प्रवाशांनी त्याला मारहाण केली आणि दोरीने बांधले. विमान विमानतळावर उतरताच त्याला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेसंबंधित कोपा एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून आपल्या क्रू मेंबर्सचे कौतुक केले आणि म्हटले आहे की, जर त्यांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नसती तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले असते. तसेच त्यांनी इतर प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

विद्यार्थ्याचा पाठलाग करून मारहाण

कॉलेजमधून घरी परतत असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यातच अडवून सहा तरुणांनी मारहाण केली. त्यांनी रस्त्यावरून शेतात धाव घेत त्याला बेल्टने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. राणीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरहरपूर येथील रहिवासी सुधीर चौरसिया यांचा मुलगा विकी चौरसिया हा हुसेनपूर येथील इंटरमीडिएट कॉलेजमध्ये इंटरमीडिएटचा विद्यार्थी आहे. मंगळवारी कॉलेजमधून घरी जात असताना नरहरपूर जनता ज्युनिअर हायस्कूलजवळ सहा जणांनी त्यांना अडवले आणि त्याला पट्ट्याने मारहाण केली.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर