कंडोमच्या पाकिटांवरून आंध्र प्रदेशात राडा! राजकीय पक्ष भिडले; काय आहे नेमके प्रकरण? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कंडोमच्या पाकिटांवरून आंध्र प्रदेशात राडा! राजकीय पक्ष भिडले; काय आहे नेमके प्रकरण? वाचा

कंडोमच्या पाकिटांवरून आंध्र प्रदेशात राडा! राजकीय पक्ष भिडले; काय आहे नेमके प्रकरण? वाचा

Feb 22, 2024 01:57 PM IST

parties clash over condom in andhra pradesh : आंध्र प्रदेशात कंडोमच्या पाकीटावरून मोठा गदारोळ झाला आहे. राजकीय पक्ष प्रचार म्हणून लोकांमध्ये त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कंडोमचे पॅकेट वितरित करत आहेत.

parties clash over condom in andhra pradesh
parties clash over condom in andhra pradesh

parties clash over condom in andhra pradesh : निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात. कधी मतदारांना लॅपटॉप, टॅबलेट, सायकली, साड्या वाटल्या जातात. तर काही पक्ष थेट पैसेही वाटत असल्याचा आरोप होतो.  मात्र, आंध्र प्रदेशमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी त्यांचे पक्षचिन्ह असलेले कंडोमचे वाटप मतदारांना केल्याने खळबळ उडाली आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी कंडोमची पाकिटे वाटल्याने संपूर्ण देशात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, येथील प्रमुख पक्ष त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कंडोमचे पॅकेट नागरिकांना वितरित करत आहेत.

X news : काही ट्विटर अकाउंट्सवर बंदी घालण्याचे भारत सरकारचे आदेश; एलॉन मस्क यांच्या कंपनीचा दावा

राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह असलेली ही कंडोमची पाकिटे आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्ष आणि प्रमुख विरोधी तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह असलेली कंडोमची पाकिटे पक्ष कार्यकर्त्यांद्वारे मतदारांमध्ये वाटली जात आहेत.

हा काय प्रकार? मीटिंग रूममधील उरलेलं सँडविच खाल्लं म्हणून महिलेला नोकरीवरून काढलं!

लोकसभा निवडणुकीसाठी घरोघरी प्रचार करणारे पक्षाचे नेते कंडोमची पाकिटेही वाटत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कंडोम वाटपावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर उभे ठाकले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. असे असतानाही दोन्ही पक्षांकडून कंडोम पाकीटे वाटण्याचे काम सुरूच आहे. वायएसआरसीपीने टीडीपीवर गंभीर आरोप करत पक्ष किती खालच्या पातळीवर जाणार असा प्रश्न विचारला आहे.

जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने देखील या प्रकारावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंडोम वाटपाचे काम थांबल्यावर हे पक्ष मतदारांना व्हायग्राचे वाटप करण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही. दरम्यान, याला टीडीपीने उत्तर दिले आहे. वायएसआरसीपीचे निवडणूक चिन्ह असलेली एकसारखी कंडोमची पाकिटेही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जनता मोहन रेड्डी ही स्वत:च्या पक्षाबद्दल बोलत आहेत काय असा सवाल त्यांनी केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर