मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Parsi New Year Navroz 2022 : आज नवरोज, पारशी नवीन वर्ष, कसं साजरं केलं जातं पारशी नववर्ष, वाचा

Parsi New Year Navroz 2022 : आज नवरोज, पारशी नवीन वर्ष, कसं साजरं केलं जातं पारशी नववर्ष, वाचा

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Aug 16, 2022 08:14 AM IST

Parsi New Year 2022 : पारशी समाजही अग्नीची पूजा करतो. त्यामुळे या दिवशी अग्नी मंदिर किंवा अग्यारीत जाऊन देवाची पूजा करणं आज अत्यंत महत्वाचं मानलं जातं. पारशी नूतन वर्षाचा आरंभ फरवर्दीन माहिन्याने होतो.नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा असतो.

पारशी नववर्ष
पारशी नववर्ष (हिंदुस्तान टाइम्स)

 भारताच्या औद्योगिक क्रांतीत, भारताच्या सर्वांगिण विकासात पारशी समाजाचं फार महत्वाचं योगदान आहे. आज भारतात प्रामुख्याने मुंबईत पारशी समाज मोठ्या संख्येने राहाताना पाहायला मिळतो. अत्यंत शांतताप्रिय समाज म्हणून पारशी समाजाकडे पाहिलं जातं. आज पारशी नववर्ष आहे. आजचा दिवस नवरोज म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. आज पारी समुदाय पारंपारिक पेहरावात तयार होतो. आपल्या आसपासच्या मंडळींच्या गाठीभेटी होतात. गोड वस्तू एकमेकांना वाटल्या जातात. मग पारशी समुदाय आपल्या परमेश्वराची प्रार्थना करतात. पारशी समाजही अग्नीची पूजा करतो. त्यामुळे या दिवशी अग्नी मंदिर किंवा अग्यारीत जाऊन देवाची पूजा करणं आज अत्यंत महत्वाचं मानलं जातं. पारशी नूतन वर्षाचा आरंभ फरवर्दीन माहिन्याने होतो.नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा असतो.

पारशी समाज मूळचा पर्शिया या देशात राहाणारा समाज. मात्र १४ व्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे वाहायला लागले आणि त्यामुळे पारशी समाजाला आपला देश सोडावा लागला. त्यानंतर पारशी समाज मोठ्या संख्येनं भारताकडे वळला आणि या समाजाने आपलं बस्तान भारतात आणि प्रामुख्याने मुंबईत बसवलं. 

पारशी नववर्ष म्हणजेच नवरोजची परंपरा तशी जववळपास साडेतीन हजार वर्ष जुनी आहे. हे नववर्ष साजरं करताना इराणी कॅलेंडर किंवा शहनशाही कॅलेंडरचा आधार घेतला जातो. या कॅलेंडरची निर्मिती पर्शियन राजा जमशेद यांने केली होती. नवरोज हा दिवस झोराष्ट्रीयन वर्षाचा पहिला दिवस आहे. ही दिवस म्हणजे पारशी आणि इराणी समुदायामध्ये शांती आणि मैत्रीची भावना वाढवणारा दिवस असतो.

पारशी समाजाने मुंबईत किंवा भारतात आपलं बस्तान बसवलं आणि मग मात्र या समाजाने भारताच्या सर्वांगिण विकासात अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिलं. आपल्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळेही पारशी लोकं ओळखली जातात. पारशी खानपानालाही भारताने अगदी सहज स्वीकारलं. गेल्या अनेक वर्षांपासून पारशी समुदायाची लोकसंख्या घटत असलेली पाहायला मिळाल्यानं आता मात्र भारत सरकारने जियो पारशी ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे पारशी समाजाला भारतीय कायद्याप्रमाणे दोन अपत्यांचं बंधन लागू होत नाही.

IPL_Entry_Point