Parrot Turns Dentist: पोपट हा सर्वात बुद्धिमान पोपट आहे. मानवी बोलण्याची नक्कल करण्याच्या उल्लेखनीय क्षमतेमुळे पोपटांनी दीर्घकाळ जगभरातील लोकांची मने काबीज केली आहेत. मात्र, पोपटाने असे काही कृत्य केले आहे, जे पाहिल्यानंतरही अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पोपट मुलाचा किडलेला दात एका झटक्यात काढतो. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ चीनमधील असल्याचे सांगण्यात आले. या व्हिडिओत एका मुलाने आपल्या हातात पोपट पकडल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर हा मुलगा पोपटला आपल्या तोंडाजवळ नेतो, त्यावेळी हा पोपट त्याचा किडलेला दात एका झटक्यात काढतो आणि जवळ उभा असलेल्या व्यक्तीच्या हातात देतो. हा व्हिडिओ अनेकांना आवडला असून अनेकजण त्याला परफेक्ट डेंटिस्ट, असे बोलत आहेत. हे अनेकांसाठी आश्चर्यचकीत करणारे असले तरी अनेक देशांत पोपटांना त्यांची मजबूत चोच आणि उल्लेखनीय कौशल्यामुळे सैल बाळाचे दात काढण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले.
पोपटांकडे दात काढण्याचे प्रभावी कौशल्य असू शकते. परंतु, सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा विचार आहे. शिकागो एक्झॉटिक्स अॅनिमल हॉस्पिटलच्या तज्ज्ञांच्या मते, मानवी लाळेत रोगजनक असतात, जे पक्ष्यांसाठी हानिकारक असू शकतात. हे रोगजनक पक्ष्यांसाठी विषारी असू शकतात. यामुळे लोकांनी पक्ष्यांना त्यांच्या तोंडाजवळ किंवा नाकाजवळ नेणे टाळावे, असा सल्ला दिला जातो.
पक्षी त्याच्या विशिष्ट गुणांमुळे लोकप्रिय ठरतो. मकाव पोपट हा त्यापैकी एक आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात मकाव पोपट आढळतात. लाकूडतोड्याच्या नजरेस हे मकाव पोपट पडले. यानंतर जगभरातून या पोपटाला मागणी वाढू लागली. विशिष्ट आकार आणि रंगामुळे मकाव पोपट लोकांना आवडतात. बाजारात या पोपटाची एक ते दीड लाख रुपये आहे. मोठे डोके आणि आकर्षक रंगामुळे हा पक्षी लक्ष वेधून घेतो. या पोपटाच्या ब्लू गोल्ड, ब्लू थ्रोटेड, ग्रीन विंग, हॅकिंथ, मिलेटरी, रेड फ्रंट हेड, कार्लेट अशा वेगवेगळ्या प्रजाती आढळतात.