नवी दिल्ली-भारताच्या संसदेत इतिहास घडला असून ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. गेल्या २७ वर्षापासून अडकलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मोठ्या मताधिक्याने मंजूर झाले आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकावर बुधवारी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात केवळ दोन सदस्यांनी मतदान केले.
महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर घटनादुरुस्ती होईल.
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर विधेयकाच्या बाजुने ४५४ सदस्यांनी मतदान केले. तर, केवळ दोन जणांनी या विधेयकाला स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. या विधेयकाच्या मतदानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सभागृहात उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनीमहिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेत समर्थन केलं.
लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर सोनिया गांधी,स्मृती इराणी, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनीयावरचर्चा केली. जवळपास सर्वांनीच या विधेयकाला समर्थन दिलं असून अखेर आज लोकसभेत विधेयक संमत करण्यात आलं आहे.याच्या समर्थनार्थ ४५४ तर विरोधात केवळ २ मते मिळाली.
आता राज्यसभेत या विधेयकाची परिक्षा होणार आहे. मात्र, राज्यसभेत मोदी सरकारला बहुमत नसले तरी या विधेयकाला मिळालेल्या समर्थनावरुन हे विधेयक तिथेही मंजूर होईल, असेच दिसून येते.