दिल्ली : संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सध्याच्या लोकसभेचे हे अधिवेशन १३ वे तर राज्यसभेचे २६१वे अधिवेशन आहे. २२ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशात विविध विधेयक सादर केले जाणार आहे.
सोमवारपासून संसदेचे पाच दिवसीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाआधी सरकार कोणते विधेयक मांडणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या अधिवेशनात संसदेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावर चर्चा होणार आहे. आजचे अधिवेशन हे नव्या संसद भवनात होणार आहे. या बाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की, या अधिवेशनात एकूण ८ विधेयके चर्चेसाठी आणि मंजूर करण्यासाठी मांडले जाणार आहेत. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित विधेयक आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आदेशाशी संबंधित ३ विधेयके सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
यापूर्वी सूचीबद्ध केलेल्या विधेयकांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकाचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, सरकार कोणते विधेयक सांभागृहात मांडणार या बाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, महिलांना आरक्षण देणारे विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्येही मांडले जाण्याची शक्यता आहे.
महिला आरक्षण विधेयक पाच दिवसांच्या अधिवेशनात मांडण्याच्या विविध पक्षांच्या मागणीवर सरकारच्या भूमिकेबाबत जोशी म्हणाले की, याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी रविवारी सकाळी नवीन संसद भवनाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावला. सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमानंतर विद्यमान संसदेचे नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
लोकसभेच्या वृत्तानुसार, या सोहळ्यात भारतीय संसदेच्या समृद्ध वारशाची आठवण केली जाणार आहे. या सोबतच २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प देखील केला जाणार आहे. २० सप्टेंबरपासून नवीन संसद भवनात सरकारचे विधिमंडळ कामकाज सुरू होणार आहे.
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सर्व खासदारांना बोलावण्यात आले आहे. नवीन संसद भवनात प्रवेश करण्यासाठी खासदारांना नवीन ओळखपत्रेही देण्यात आली आहेत.
या अधिवेशनात पोस्ट ऑफिस बिल २०२३ मांडले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक १० ऑगस्ट २०२३ रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले होते. कार्य सूची तात्पुरती असून त्यात वेळेवर आणखी काही विषय घेतल्या जाऊ शकतात. १८ सप्टेंबरपासून ३१ ऑगस्टपासून सुरू होणारे संसदेचे ५ दिवसीय 'विशेष अधिवेशन' जाहीर करताना जोशी यांनी त्यासाठी कोणताही विशिष्ट अजेंडा दिलेला नव्हता. असे असले तरी संसदेच्या अधिवेशनादरम्यान, जी २० शिखर परिषदेचं यश, चंद्रावर चांद्रयान-३ चं सॉफ्ट लँडिंग आणि स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. 'वन नेशन वन इलेक्शन' आणि देशाचे नाव 'इंडिया' वरुन 'भारत' करण्याचा प्रस्तावही या अधिवेशनात आणला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अधिवेशनाच्या सुरुवातीला जुन्या संसद भवनात होणार आहे. अधिवेषणापूर्वी जुन्या संसद भवनातच फोटो सेशनचं आयोजन करण्यात आले आहे. सर्व सदस्य सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश करणार आहे. १९ सप्टेंबरलाच नवीन इमारतीत होणार असून तिथे २० सप्टेंबरपासून नियमित कामकाज सुरु होणार आहे.
दरम्यान भाजप आणि काँग्रेसने यापूर्वीच आपापल्या खासदारांना संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे.
संबंधित बातम्या