मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : “महिला विधेयक अर्धवट; ..तेव्हाच हे पूर्ण होईल”, राहुल गांधींची लोकसभेत मोठी मागणी

Rahul Gandhi : “महिला विधेयक अर्धवट; ..तेव्हाच हे पूर्ण होईल”, राहुल गांधींची लोकसभेत मोठी मागणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 20, 2023 07:39 PM IST

Parliament special session : संसदेत काँग्रेस नेतेर राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाचं समर्थन केलं आहे, पण त्याचबरोबर त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

लोकसभेमध्ये महिला विधेयकावर आज चर्चा झाली. सोनिया गांधींनी या विधेयकाला पाठिंबा दिला मात्र जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत विधेयक अर्धवट असल्याचं म्हटलं. यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण द्यायला हवे, तेव्हाच हे विधेयक पूर्ण होईल, अशी मागणी राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषणावेळी केली.

ट्रेंडिंग न्यूज

महिला आरक्षण विधेयकावर चर्चेत भाषण करताना राहुल गांधी यांनी विधेयकाचं समर्थन केलं आहे, पण त्याचबरोबर त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. हे विधेयक अपूर्ण आहे. यात ओबीसी आरक्षण असायला हवं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. भारत सरकारमध्ये ९० सचिव आहेत. यापैकी किती सचिव OBC प्रवर्गातील आहेत, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल म्हणाले की, ९० पैकी केवळ ३ ओबीसी सचिव आहेत. हे धक्कादायक आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकात ओबीसी आरक्षणाचीही तरतूद असायला हवी असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाल्या की, संसदेची नवी इमारत चांगली आहे, पण या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात महिला राष्ट्रपती का नव्हत्या असा प्रश्न उपस्थित केला. याबरोबरच नव्या संसदेतील सेंगोलवरही प्रश्न उपस्थित केला.

महिला आरक्षण विधेयकाला आम्हाचा पाठिंबा आहे. लोकांना जास्तीजास्त अधिकार मिळाले पाहिजे. महिला आरक्षणामध्ये एससी/एसटीसह ओबीसी आरक्षणची तरतूद केली पाहिजे,अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

WhatsApp channel