Asaduddin Owaisi : शपथ घेतल्यानंतर ओवैसींचा ‘जय भीम’, ‘जय मीम’सोबत 'जय पॅलेस्टाईन'चा नारा, संसदेत गोंधळ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Asaduddin Owaisi : शपथ घेतल्यानंतर ओवैसींचा ‘जय भीम’, ‘जय मीम’सोबत 'जय पॅलेस्टाईन'चा नारा, संसदेत गोंधळ

Asaduddin Owaisi : शपथ घेतल्यानंतर ओवैसींचा ‘जय भीम’, ‘जय मीम’सोबत 'जय पॅलेस्टाईन'चा नारा, संसदेत गोंधळ

Jun 25, 2024 05:25 PM IST

Asaduddin Owaisi Oath : एमआयएम अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संसद सदस्यत्वाची शपथ घेताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिल्याने संसदेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भाजप खासदारांनी याला विरोध केल्यानंतर हे शब्द संसदेच्या कामकाजातून हटवण्यात आले आहे.

एमआयएम अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी
एमआयएम अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी

Aimim mp Asaduddin Owaisi takes oath : एमआयएम अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी १८ व्या लोकसभेच्या सदस्यत्वाची मंगळवारी शपथ घेतली. आपली शपथ पूर्ण केल्यानंतर त्यांनी जय भीम, जय मीम, जय तेलंगाना आणि जय पॅलेस्टाईन घोषणा दिल्या. त्याचबरोबर ओवैसी यांनी 'अल्लाह हू अकबर' ही म्हटले. या घोषणेनंतर भाजपच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेत विरोध केला. भाजप खासदारांच्या विरोधानंतर हंगामी अध्यक्षांनी हे शब्द संसदेच्या कामकाजातून हटवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

असदुद्दीन ओवैसी यांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी आपली प्रतिस्पर्धी भाजपच्या माधवी लता यांचा ३ लाख ३८ लाखांहून अधिक मताधिक्यांनी पराभत केले. ओवैसी यांना ६,६१,९८१  मते मिळाली तरमाधवी लता यांना ३,२३,८९४ मतांवर समाधान मानावे लागले. ओवैसी२००४ पासून हैदराबाद मतदारसंघातून विजयी होत आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघ एमआयएमचा गड राहिला आहे. १९८४ पासून येथे मुस्लिमांचा लोकसंख्या वाढली आहे.

१८ व्यालोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. आज ओम बिरला, पीपी चौधरी, अमरिंदर सिंह, राजा वडिंग, चरणजीत सिंह चन्नी, हरसिमरत कौर बादल, सुप्रिया सुळे, नारायण राणे, श्रीकांत शिंदे आणि संबित पात्रा यांच्यासह अनेक खासदारांनी शपथ घेतली.

लोकसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांना शपथविधीनंतर संसदेत जय पॅलेस्टाईन म्हटल्याने वाद निर्माण झला. हंगामी अध्यक्षांनी अससुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी'जय भीम, जय तेलंगणा' आणि नंतर'जय पॅलेस्टाईन'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला.

लोकसभेत आज अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, चंडीगड, दिल्ली, दादरा नागर हवेली, गुजरात,हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लडाख, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथ ग्रहण समारंभ झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर