मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Parliament Building Inauguration Rjd Compares New Parliament Building To A Coffin

Parliament Building Inauguration : लालूंच्या ‘राजद’कडून नवीन संसद भवनाची शवपेटीशी तुलना

 Rjd compares new parliament building to a coffin
Rjd compares new parliament building to a coffin
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
May 29, 2023 12:21 AM IST

Rjd compares new parliament building to a coffin : बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या राजदने केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नवीन संसद भवनाची इमारत आणि शेजारी एक शवपेटीचे चित्र पोस्ट करत ‘हे काय आहे?’असा सवाल केला आहे.

New Parliament Building Inauguration : लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (राजद) नवीन संसद भवनाची तुलना शवपेटीशी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसदभवनाचे उद्घाटन होताच बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या राजदने केलेल्या ‘ट्वीट’ मध्ये नवीन संसद भवनाची इमारत आणि शेजारी एक शवपेटीचे चित्र पोस्ट करत ‘हे काय आहे?’असा सवाल केला आहे. त्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता राजदला शवपेटीत गाडेल, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बिहार भाजपने या ट्विटचा निषेध करत याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने म्हटले आहे की, पहिले शवपेटीचे चित्र तुमचे भवितव्य आहे आणि दुसरे संसद भवनाचे चित्र भारताचे भवितव्य आहे. भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ‘राजद’च्या ‘ट्वीट’ला घृणास्पद म्हटले आहे. गौरव भाटिया यांनी नमूद केले,की शवपेटी राजदची आणि संसद देशाची आहे. पूनावाला म्हणाले,की ‘राजद’ किती खालच्या पातळीवर घसरली आहे,हे यावरून दिसते. राजदचे राजकारण शवपेटीत जाऊन ते बंदिस्त केले जाईल.

राजदकडून करण्यात आलेल्या ‘ट्वीट’ चे समर्थन करताना राजदचे बिहार शाखेचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले, की ज्या पद्धतीने नव्या संसद भवनाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले,त्यावरून लोकशाही गाडली गेल्याचेच दिसते. राष्ट्रपती किंवा राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती यांना या सोहळय़ाचे आमंत्रण नव्हते. लोकशाहीमध्ये असे घडत नसते.

 

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. २८ मे हा असाच एक दिवस आहे. ते म्हणाले की ही केवळ एक इमारत नाही तर १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे हे प्रतिबिंब आहे.

WhatsApp channel