Union Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, राष्ट्रपतींचे होणार अभिभाषण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Union Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, राष्ट्रपतींचे होणार अभिभाषण

Union Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, राष्ट्रपतींचे होणार अभिभाषण

Jan 31, 2023 06:47 AM IST

Parliament Budget Session: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण या २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज राष्ट्रपतींचे अभिभाषण तसेच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे.

Nirmala sitharaman_HT
Nirmala sitharaman_HT

नवी दिल्ली : देशाच्या २०२३-२४च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात होणार आहे. उद्या बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अभिभाषण करणार आहेत. तर सीतारमण या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत.

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे खास राहणार आहे. मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पांत कुठल्या गोष्टी महाग होणार कुठल्या गोष्टी स्वस्त: होणार या कडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे. या सोबतच नवे कर किंवा करवाढ या सारख्या बाबी देखील महत्वाच्या ठरणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज तब्बल ६६ दिवस सुरू राहणार आहे. ३१ जानेवारी ते ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर १४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत सुट्टी असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा हा १३ मार्चपासून सुरू होणार आहे.

आज अभिभाषणा दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करणार असून त्यानंतर सीतारमण या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करतील. उद्या १ फेब्रुवारी रोजी त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

यावर्षी कर उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ होणार आहे. पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही नवा कर लागणार नाही. भारताची अर्थव्यवस्था आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये चढ-उतार होत असतानाही देश वेगाने प्रगती करत असल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर