आई-वडिलांच्या पवित्र नात्याला काळिमा! नवीन बाईक घेण्यासाठी ९ दिवसांच्या नवजात बाळाला ६० हजारात विकले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आई-वडिलांच्या पवित्र नात्याला काळिमा! नवीन बाईक घेण्यासाठी ९ दिवसांच्या नवजात बाळाला ६० हजारात विकले

आई-वडिलांच्या पवित्र नात्याला काळिमा! नवीन बाईक घेण्यासाठी ९ दिवसांच्या नवजात बाळाला ६० हजारात विकले

Dec 29, 2024 07:59 PM IST

Odisha News :ओडिशातील बालासोरमध्ये आई-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घटना समोर आली आहे. नवी बाईक विकत घ्यायची असल्याने आई-वडिलांनी आपल्या ९ दिवसांच्या बाळाला ६०,००० हजार रुपयांना विकल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

दाम्पत्याने नवी बाईक घेण्यासाठी ९ महिन्याचे बाळ विकले.
दाम्पत्याने नवी बाईक घेण्यासाठी ९ महिन्याचे बाळ विकले.

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात आई-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील बस्ता परिसरातील एका दाम्पत्याने दुचाकी विकत घ्यायची असल्याने आपल्या नऊ दिवसांच्या नवजात अर्भकाची विक्री केली. या दाम्पत्याने आपले मूल केवळ ६० हजार रुपयांना दुसऱ्या कुणाला विकल्याची माहिती समोर आली आहे. या बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळताच पोलिसांनी नवदाम्पत्यापासून मुलाची सुटका केली आहे. आरोपी दाम्पत्याने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ते त्यांचे संगोपन करण्यास असमर्थ असल्याने त्यांनी आपले मूल नि:संतान दाम्पत्याला दान केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्याने आपले मूल मयूरभंज जिल्ह्यातील उडाला येथील संकुला गावातील एका नि:संतान दाम्पत्याला ६० हजार रुपयांना विकले आणि त्यातील काही रक्कम दुचाकी खरेदी करण्यासाठी खर्च केली. मात्र, दांपत्याने हे आरोप फेटाळून लावत अत्यंत गरिबीमुळे बाळाचे संगोपन करणे शक्य नसल्याने आपण हे मूल दान केल्याचे सांगितले.

सीडब्ल्यूसीचे सदस्य मनमोहन प्रधान यांनी सांगितले की, "बाळ विकले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांसह बाळ विकत घेणाऱ्या जोडप्याचा शोध घेतला. यानंतर नवजात अर्भकाला वाचवण्यात यश आले. बाळ सुरक्षित आहे आणि आता आमच्याकडे आहे.

दरम्यान, बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकही पैसा न देता बाळ विकत घेतल्याची कबुली दिली आहे. आर्थिक फायद्यासाठी मुलाची विक्री केली नाही किंवा खरेदीदारांकडून एक पैसाही घेतला नाही, असा दावा अर्भकाच्या पालकांनी केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोपांनुसार, अर्भकाच्या दाम्पत्याने बाळाला ६० हजार रुपयांना विकले आणि वडिलांनी त्यातील काही रक्कम मोटारसायकल खरेदी करण्यासाठी वापरली. सीडब्ल्यूसीने या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी विक्रेते आणि खरेदीदार कुटुंबांना समन्स बजावले आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर