ऑस्ट्रेलियात आई-वडिलांना मुलीवर अत्याचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना नेहमी तिला सडपातळ ठेवायचे होते. आपली मुलगी कधीही मोठी होऊ नये, अशी ही त्यांची इच्छा होती. तिला नेहमी लहान मुलीसारखं बघायचं होतं. त्यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिचे खाणे-पिणे खूपच कमी केले. तिचा आहारही अतिशय काटेकोर ठेवण्यात आला होता. दोषी आढळलेले दाम्पत्य पर्थ शहरातील आहे. आपल्या मुलीला पुरेसे पोषण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुलगी १६ वर्षांची झाली तरी तिचे वजन फक्त २७ किलो होते.
रिपोर्टनुसार, पुरेसे अन्न न मिळाल्याने मुलगी खूप पातळ झाली होती. एके दिवशी ती आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिची प्रकृती एवढी चिंताजनक झाली की, तिला फीडिंग ट्यूबवर ठेवावे लागले. विशेष म्हणजे तिच्या आई वडिलांनाही आपलं वय लपवायचं होतं. त्यासाठी त्यांनी मुलीच्या जन्म दाखल्यावर वाढदिवस बदलण्याचा प्रयत्न केला. ती १६ वर्षांची होती, पण तिच्या आई-वडिलांनी तिला प्रीस्कूल वयाचे कपडे घातले होते. आपल्या मुलीला लहान मुलीसारखं दिसावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
आपल्या मुलीचा भावनिक, सामाजिक आणि शारीरिक विकास करण्यात अपयशी ठरल्याबद्दलही या दाम्पत्याला दोषी ठरवण्यात आले. मुलीला बहुतेक घरीच ठेवण्यात आले होते आणि तिचे शिक्षण घरीच झाले होते. एक प्रकारे तिला जगापासून लपवून ठेवण्यात आले होते. ती आजारी पडल्यावर डॉक्टर तिला भेटायला आले. ती किती पातळ झाली आहे याबद्दल तिने चिंता व्यक्त केली. त्यांनी मुलीला पुरेसे अन्न देण्याचा सल्ला दिला. हे प्रकरण समोर येताच सोशल मीडियावर लोकांचा संताप उफाळून आला. इंटरनेट वापरकर्त्यांनी मुलीच्या आई-वडिलांवर जोरदार टीका केली आहे.
संबंधित बातम्या