Viral Video : तेलाऐवजी डिझेल टाकून बनवले जातात पराठे, व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ; काय आहे सत्य?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : तेलाऐवजी डिझेल टाकून बनवले जातात पराठे, व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ; काय आहे सत्य?

Viral Video : तेलाऐवजी डिझेल टाकून बनवले जातात पराठे, व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ; काय आहे सत्य?

May 16, 2024 09:59 AM IST

diesel paratha chandigarh viral video : चंदीगड येथे डिझेलचा वापर करून पराठे तयार करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या विडियोमागचे सत्य बाहेर आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, ढाब्यावर असलेल्या व्यक्तीने दावा केला की दररोज सुमारे ३०० लोक डिझेल पराठे खातात.

चंदीगड येथे डिझेलचा वापर करून पराठे तयार करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
चंदीगड येथे डिझेलचा वापर करून पराठे तयार करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

diesel paratha chandigarh viral video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की चंदीगडमधील एका  रेस्टॉरंटमध्ये पराठे शिजवण्यासाठी डिझेल वापरले जात आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ तयार करणाऱ्या ब्लॉगरने रोज  ३०० लोक हा डिझेल पराठा आवडीने खात असल्याचा दावा देखील केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडीओवरुन बराच गदारोळ सुरु झाला आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडिओची सुरुवात एका रेस्टॉरंटमध्ये एका माणसाने पीठ मळून त्यात बटाट्याचे मिश्रण भरून केली. यावेळी व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने त्याला विचारले की तू काय बनवत आहेस, तर त्याने ‘डिझेल पराठा’ बनवत असल्याचे सांगितले.

चंदीगड येथील एका हॉटेलमधील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पराठा तयार करणाऱ्याने पराठा थापून तव्यावर टाकला. यानंतर त्याने पराठा भाजला व पुन्हा शिजवण्यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात तेल ओतले. हे तेल डिझेल असल्याचे त्याने व्हिडिओ शूट करणाऱ्या ब्लॉगरला सांगितले. व्हिडिओमध्ये, ढाब्यावर असलेल्या एका व्यक्तीने दररोज सुमारे ३०० लोक "डिझेल पराठे" खात असल्याचा दावा देखील केला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. अनेकांनी अन्न आणि प्रशासन विभागाने या हॉटेलची चौकशी करून कारवाई करण्याची  मागणी केली.

या व्हिडिओनंतर, फूड जॉइंटचे मालक चन्नी सिंग यांनी या खुलासा केला आहे. ते म्हणाले "डिझेल पराठ्यासारखे कोणताही खाद्य पदार्थ आम्ही तयार करत नाहीत. तसेच खाद्य पदार्थ तयार करतांना खाद्यतेलाचा वापर आम्ही करतो. एएनआयला या बाबत माहिती देतांना चन्नी म्हणाले, "आम्ही 'डिझेल पराठा' सारखे काहीही पदार्थ तयार करत नाही किंवा ग्राहकांना असे पदार्थ खायला देखील देत नाहीत. एका ब्लॉगरने तो व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवला होता."

मुंबईच्या चाळीत जन्मलेला पोरगा आज गाजवतोय बॉलिवूड! जाणून घ्या विकी कौशलविषयी खास गोष्टी

पराठा तयार करतांना आम्ही तूप, लोणी किंवा तेलाचा वापर करतो. डिझेलने तयार केलेला पराठा कोणी खाणारही नाही, आम्ही फक्त खाद्यतेल वापरतो. आम्ही इथल्या लोकांना स्वच्छ, रुचकर अन्न पुरवतो. आम्ही लोकांच्या जीवाशी खेळत नाहीत. रेस्टॉरंटच्या मालकाने असेही सांगितले की हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याची माहिती नव्हती आणि व्हिडिओ बनवणाऱ्या फूड ब्लॉगरने तो त्याच्या ब्लॉगवरून काढून टाकला आहे.

हा व्हिडिओ बनवणाऱ्या फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंगने मंगळवारी माफी देखील मागितली आणि सांगितले की त्याने तयार केलेल्या डिझेल पराठा हा व्हिडिओ खोटा आहे. हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल त्याने माफी देखील मागितली आहे. अमनप्रीत सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर सांगितले की, पराठे डिझेलमध्ये नव्हे तर खाद्य तेलात तळलेले आहेत. ते म्हणाले, "मी आदरणीय चंदीगड प्रशासनाची, चंदीगडच्या चांगल्या लोकांची आणि संपूर्ण भारताची नम्रपणे माफी मागतो. माझ्या अलीकडील व्हिडिओमुळे झालेल्या त्रासाबबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो, असे सिंग म्हणाला.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर