मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत तरुणीचा लव्ह, सेक्स अन् धोका; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने केला खून

आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत तरुणीचा लव्ह, सेक्स अन् धोका; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने केला खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 01, 2024 11:35 AM IST

jharkhand hazaribagh sportsman murder : आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू प्रशांत कुमार सिन्हा यांची झारखंडमधील हजारीबाग येथे हत्या करण्यात आली. पैशाच्या व्यवहारावरून प्रशांतची प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत तरुणीचा लव्ह, सेक्स अन् धोका; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने  केला खून
आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत तरुणीचा लव्ह, सेक्स अन् धोका; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने केला खून

jharkhand hazaribagh sportsman murder : झारखंड येथील आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू प्रशांत कुमार सिन्हा यांची हजारीबाग येथे हत्या करण्यात आली. उधार घेतलेले २० लाख रुपये परत करण्याची मागणी केल्यानंतर प्रशांतच्या प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आधी तिने प्रशांत सोबत प्रेमाचे नाटक केले. त्याच्याशी जवळीक वाढवत प्रशांतचा वापर करून त्याच्याकडून पैसे उकळत प्रियकरासह हॉटेलही थाटले. याची माहिती प्रशांतला कळल्यावर त्याने पैशांची मागणी केल्याने त्याची हत्या करण्यात आली.

MF kyc news : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! ‘या’ खात्यांसाठी पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही!

काजल सुमन आणि तिचा प्रियकर रौनक कुमार असे आरोपींची नावे आहे. त्यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. तर पॅरा बॅडमिंटनपटू प्रशांत कुमार सिन्हा असे खून झालेल्या खेळाडूचे नाव आहे. सिंघभूमचे एसएसपी किशोर कौशल यांनी या बाबत माहिती देतांना सांगितले की, काजलने रौनकसोबत मिळून प्रशांतची हत्या केली आणि नंतर मृतदेह एका पोत्यात बांधून हजारीबागमधील छडवा धरणाच्या खाली फेकून दिला. पोलिसांनी आरोपी रौनककडून प्रशांतचे मनगटाचे घड्याळ आणि घटनेत वापरलेली स्कूटर जप्त केली आहे. २०१९ मध्ये प्रशांतची फेसबुकच्या माध्यमातून काजलशी मैत्री झाली.

Pune Crime : पुण्यात आई-मुलाच्या नात्याला काळिमा! घर नावावर करून देत नसल्याने मुलांची आईला गंभीर मारहाण

काजलने प्रशांतचा फोटो पाहून सेलिब्रिटींसोबतचा फोटो वापरण्यास सुरुवात केली. दरम्यान दोघांचे सूत जुळले. काजल ही प्रशांतकडे पैशांची मागणी करत होती. प्रशांत देखील लोकांकडून पैसे उधार घेऊन काजलला देत होता. काजलने ते पैसे प्रियकर रौनकवर खर्च केले आणि दोघांनी मिळून हॉटेल उघडण्याची तयारी सुरू केली. प्रशांतने पैसे घेतले होते, त्यातील काहींना त्याने काजलचा नंबरही दिला होता. उधार घेतलेल्या पैशासाठी लोक काजलसह प्रशांतला फोन करू लागले. याचा दबाव प्रशांतवर वाढू लागल्याने प्रशांतने काजलमागे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. यामुळे दोघांनीही प्रशांतचा काटा काढण्याचे ठरवले.

११ मार्चला काजल जमशेदपूरला आली आणि सोनारीहून हजारीबागला प्रशांतला घेऊन गेली. इकडे दोघेही रौनकच्या घरी गेले. या ठिकाणी पैशांवरून दोघांचा प्रशांतसोबत वाद झाला, त्यानंतर दोघांनीही प्रशांतचा गळा आवळून खून केला. या नंतर त्याचा मृतदेह पोत्यात बांधून छाडवा धरणात फेकून दिला. एसएसपी म्हणाले की, प्रशांत बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी काजलशी चर्चा केली. त्याचा शोध घेण्यासाठी टेक्निकल सेलची मदत घेण्यात आली आणि हजारीबाग शहरातील लोहसिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू एरिया निर्मल स्कूल गली येथे राहणाऱ्या काजल सिन्हा हिला अटक करण्यात आली. काजलची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली.

IPL_Entry_Point