मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pankaj Tripathi : अभिनेते पंकज त्रिपाठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले, कारण..

Pankaj Tripathi : अभिनेते पंकज त्रिपाठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले, कारण..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 11, 2024 08:40 PM IST

Pankaj Tripathi EC Nationl Icon :लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वीपंकज त्रिपाठीयांनीनिवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारणही समोर आले आहे.

Pankaj Tripathi
Pankaj Tripathi

'मैं अटल हूं' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाचे आयकॉन पद सोडले आहे. सध्या ते मै अटल हू चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपटमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. आता लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये पंकज त्रिपाठी यांना निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉनपदी नियुक्त केले होते. निवडणूक आयोगाने आपल्या एक्‍स खात्यावर एक पोस्‍ट लिहिली आहे. आपल्या आगामी चित्रपटात एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेने पंकज त्रिपाठी यांनी MOU च्या अटीनुसार स्वेच्छेने ECI नॅशनल आयकॉनपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ पासूनमतदार जनजागृती आणि SVEEP मध्ये दिलेल्या प्रभावी योगदानाबद्दल निवडणूक आयोगाने आभार प्रकट केले आहे.

आपल्या आगामी'मैं हूं अटल' या चित्रपटामुळे पंकज त्रिपाठी यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटात ते ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले असून हा चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकारणातील प्रवेशाबाबत पंकज त्रिपाठी म्हणाले की, बिहारमध्ये सर्वच राजकीय नेते असतात. आपल्या महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) सदस्य असणारे त्रिपाठी यांनी म्हटले की, त्यावेळी राजकारण जाण्याचा विचार केला नव्हता.

WhatsApp channel