Wedding Viral Video: सोशल मीडियावर लग्नाताली अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील बहुतेक व्हिडिओ वर आणि वधू यांच्याशी संबंधित असतात. मात्र, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या एका व्हिडिओमध्ये लग्न लावणारा भटजी सगळ्यांचे आकर्षण ठरले आहे. कारण, हा भटजी मंत्र उच्चारून वर- वधूंना आर्शिवाद देण्याऐवजी चक्क चित्रपटातील गाणी गाऊन वऱ्हाड्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडियोमध्ये वर आणि वधू हे दोघेही लग्न मंडपाच्या मधोमध बसले आहेत. त्यांच्यासमोर एक भटजी आहे. मात्र, हा भटजी लग्न लावण्यासाठी मंत्रांऐवजी चक्क चित्रपटांतील गाणी गाताना दिसत आहे. हे पाहून लग्नात वर आणि वधूला आशिर्वाद देण्यासाठी आलेले पाहुणे मंडळी काही क्षण आश्चर्यचकित होतात. हा व्हिडिओ वाऱ्याचा वेगाने वायरल होत आहे. @ChapraZila या ट्विटर अकाऊंटवरून हा वीडियो शेअर करण्यात आला. या व्हिडीओला खूप लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट येत आहेत.
हा व्हिडिओ बिहारमधील छपरा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,"तुमच्याकडे असे पंडितजी असतील तर लग्नाची रात्र सहज पार पडेल." अडीच मिनिटांच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या भटजीला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.