Palghar Accident : कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार; पालघर येथील घटना
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Palghar Accident : कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार; पालघर येथील घटना

Palghar Accident : कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार; पालघर येथील घटना

Dec 31, 2024 01:17 PM IST

Palghar Dahanu Accident News: पालघरमध्ये कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

पालघर: कार आणि दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू
पालघर: कार आणि दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू

Car and Bike Collision In Palghar: पालघर येथील डहाणूमध्ये कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना कासा- सायवन मार्गावर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

राहुल हरके (वय, २०), चिन्मय चौरे (वय, १९) आणि मुकेश वावरे (वय, २०) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा चारोटी परिसरातील रहिवासी आहेत. दरम्यान, सोमवारी हे तिघेजण एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना कासा- सायवन मार्गावर भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत राहुल, चिन्मय आणि मुकेश यांच्या डोक्याला आणि पायांना गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात एक महिला देखील जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी धाव झाले. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, इको कार जागीच उलटली. तर, दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. घरातील तरुण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात तिन्ही तरुणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर