मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan : पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांवर जमावाकडून हल्ला; ड्रायव्हरच्या सावधानतेमुळं मोठा अनर्थ टळला

Pakistan : पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांवर जमावाकडून हल्ला; ड्रायव्हरच्या सावधानतेमुळं मोठा अनर्थ टळला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 11, 2023 04:07 PM IST

Mob Attack On Rana Sanaullah : गृहमंत्री सनाउल्लाह यांच्या वाहनांचा ताफा शहरात दाखल झाल्यानंतर अचानक जमावानं त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mob Attack On Pakistani HM Rana Sanaullah
Mob Attack On Pakistani HM Rana Sanaullah (HT)

Mob Attack On Pakistani HM Rana Sanaullah : शासकीय कार्यक्रमासाठी निघालेल्या पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांवर जमावानं हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी संपूर्ण पंजाबमध्ये आरोपींची धरपकड सुरू केली असून त्यानंतर आता पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. थेट देशाच्या गृहमंत्र्यांवर हल्ला करण्यात आल्यामुळं पाकिस्तानसह जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह हे पंजाब प्रांतातील एका शासकीय कार्यक्रमासाठी निघालेले असताना अचानक त्यांच्यावर शेकडोंच्या जमावानं त्याच्यावर चपला, बूटांसह दगडफेक करायला सुरुवात केली. त्यामुळं घाबरलेल्या सनाउल्लाह यांच्या गाडीच्या ड्रायव्हरनं गर्दीतून सुस्साट गाडी चालवून सनाउल्लाह यांना सुरक्षितरित्या वाचवलं आहे. जमावाच्या हल्ल्यात गृहमंत्री सनाउल्लाह यांच्या वाहनासह ताफ्यातील अनेक वाहनांच्या काचा फुटल्या असून दोघांना गंभीर मार लागला आहे. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या हल्ल्याचा आरोप पीटीआयच्या नेत्यांवर केला आहे. त्यामुळं आता यावरून पाकिस्तानात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये पीटीआय आणि मुस्लिम लीग आमने-सामने...

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पीटीआयची सत्ता आहे. तर केंद्रातील सत्ताधारी मुस्लिम लीग पार्टी विरोधी पक्षात असल्यानं दोन्ही पक्षात राजकीय वातावर पेटलेलं आहे. मुस्लिम लीगच्या नेत्यांनी इमरान खान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार करत पाकिस्तानमध्ये सत्तांतर केलं होतं. तेव्हापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्यावर जमावानं हल्ला केल्यानंतर पाकिस्तानातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

IPL_Entry_Point