मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral video : पाकिस्तानी महिलेच्या कुर्त्यावरून वाद! संतप्त जमावाचा हल्ला; पोलिसांमुळे वाचली महिला

viral video : पाकिस्तानी महिलेच्या कुर्त्यावरून वाद! संतप्त जमावाचा हल्ला; पोलिसांमुळे वाचली महिला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 26, 2024 01:59 PM IST

pakistani women attacked by mob : पाकिस्तानमधील एक महिला जमावाच्या रागाची शिकार झाली. संतप्त जमावाने तिच्यावर हल्ला केला. या घटनेतून महिला सुदैवाने वाचली आहे. महिलेच्या कुर्त्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिले होते, यामुळे जमाव संतापला. यानंतर पोलिसांनी या महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

pakistani women attacked by mob
pakistani women attacked by mob

pakistani women attacked by mob : पाकिस्तानातील लाहोरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतप्त जमावाने या महिलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. ही महिला एक कुर्ता घालून होती, ज्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिले होते. कुर्त्यावर कुराणातील काही ओवी लिहिल्या असल्याचा दावा अनेकांनी केला. यामुळे जमाव महिलेवर चिडला. ही महिला जेव्हा एका रेस्टॉरंटमध्ये गेली, तेव्हा जमावणे तिच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी पोलिसांचे म्हणणे आहे की, ही महिला तिच्या पतीसोबत खरेदीसाठी गेली होती. त्यानंतर जमावाने महिलेला घेरले आणि तिचा कुर्ता फडण्याच प्रयत्न केला.

या घटनेचा व्हिडिओ जारी करताना पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिला पोलिसांने परिस्थिती कशीतरी हाताळली. तिने कसेतरी महिलेला गर्दीतून बाहेर काढले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक पाकिस्तानी पोलीस अधिकारी त्या महिलेला गर्दीतून बाहेर काढत आहे. या पोलिस अधिकारी महिलेने जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता.

Supriya Sule: नवऱ्यानं पेपर लिहायचा आणि मी पास व्हायचं असं करणार नाही; सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला

या घटनेमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेक लोक या महिलेला विरोध करत आहेत, तर काही जन तिच्या समर्थनातही उतरले आहेत. एका माजी नेटकऱ्याने म्हटले की, लाहोरमध्ये घडलेली ही घटना धक्कादायक आहे. जर महिला पोलिस अधिकाऱ्याने या महिलेला जमावपासून वाचवले नसते तर धर्माच्या नावाखाली तिची हत्या करण्यात आली असती. या महिलेच्या कुर्त्यावर अरबी शब्द लिहिल्याचा आरोप होता.

आणखी एका युजर म्हणाला, महिलेला जमावाने घेरले होते कारण तिच्या कपड्यांवर अरबी भाषेत काही शब्द लिहिले होते. काही लोक म्हणाले की ही कुराणातील ओवी आहेत. पण ते खरे नाही. त्याच्या कुर्त्यावर जे लिहिले होते त्याचा अर्थ फक्त 'सुंदर' असा होता. हा एक साधा अरबी शब्द आहे. ताब्यात घेतल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात मौलवीसमोर माफीही मागितली आणि आता पुन्हा असे कपडे घालणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, व्हीडिओत ही महिला चांगलीच घाबरली असल्याचे दिसत आहे. लोक तिच्या आजूबाजूला जमले असून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

 

 

WhatsApp channel

विभाग