Viral Video : हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकतं! विमानाचा पायलट काय करतोय एकदा बघाच!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकतं! विमानाचा पायलट काय करतोय एकदा बघाच!

Viral Video : हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकतं! विमानाचा पायलट काय करतोय एकदा बघाच!

Published Sep 04, 2024 11:45 AM IST

Pakistan pilot Viral Video: पाकिस्तानी पायलटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाकिस्तानी पायलटचा व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानी पायलटचा व्हिडिओ व्हायरल

Pakistan pilot cleaning airplane window: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. सध्या पाकिस्तानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरता येईना. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाकिस्तानच्या विमानतळाचा आहे, जिथे पायलट विमानाची विंडशील्ड साफ करत आहे. खूप क्वचितच लोकांनी पायलटला विमानाची विंडशील्ड साफ करताना पाहिले असेल. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

व्हिडिओमध्ये पायलट विमानाच्या खिडकीतून बाहेर वाकून विंडशील्ड साफ करताना दिसत आहे. विमानतळावर उभा असलेल्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. क्लिप रेकॉर्ड करणारे प्रवासी विंडशील्ड साफ केल्याबद्दल पायलटची खिल्ली उडवत असल्याचे ऐकू येत आहे. बिचारा पायलट विंडशील्ड साफ करत आहे. माझी गाडी पण साफ करून दे, तुला आशिर्वाद मिळेल, असे एकजण बोलत असल्याचे ऐकू येत आहे.

हा व्हिडिओ २ सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून त्याला जवळपास नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, जवळपास १० हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि ही संख्या वाढतच चालली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका व्यक्तीने असे म्हटले आहे की, 'यात काही नवीन नाही, हा त्यांच्या कामाचा भाग आहे. ज्यावेळी धुके पडतात, तेव्हा विंडशील्ड साफ करणे गरजेचे असते. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, हे हास्यास्पद आहे, जे फक्त पाकिस्तानातच घडू शकते. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'हे खूप सामान्य आहे. आपल्या वाहनाची काच साफ करण्यात काहीच चुकीचे नाही. आपण सगळेच हे करतो.'

विमानाच्या दारात उभे राहून मळली तंबाखू, व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांआधी विमानतळावरील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात एक व्यक्ती विमानाच्या दरवाज्यात उभा राहून चक्क तंबाखू मळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्काच बसला. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून बऱ्याच लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. या व्हिडिओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. पण व्हिडिओत दिसणारा व्यक्ती भारतीय असल्याचे बोलले जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर