पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील चिमुकली शुमैला सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. टॅलेंट आणि मेहनतीला हायफाय शिक्षणाची गरज नसते, हे शुमैलाने सिद्ध केले. गरिबीत वाढलेली ही मुलगी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर करतेच, शिवाय शाळेत न जाता ६ भाषा अस्खलितपणे बोलू शकते. हे अभूतपूर्व कौशल्य पाहून सोशल मीडियावर लोक हैराण झाले आहेत.
शुमैला एका गरीब कुटुंबातील आहे. शाळेचा चेहराही तिने कधी पाहिला नाही, कारण लहानपणापासूनच ती वडिलांना मदत करू लागली. लोअर दीर भागात रस्त्याच्या कडेला भुईमूग आणि सूर्यफूलाचे बियाणे विकून हे कुटूंब आपला उदरनिर्वाह करतात. पण या संघर्षमय जीवनात त्यांनी स्वत:ला ६ भाषांमध्ये पारंगत बनवले आहे. उर्दू, इंग्रजी, चित्राली, सरायकी, पंजाबी आणि पश्तो या भाषांमध्ये ती इतकी अस्खलितपणे बोलते की ऐकणारे थक्क होतात.
नुकताच पाकिस्तानी व्लॉगर झिशानने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला तेव्हा शुमैलाचं टॅलेंट जगासमोर आलं. पेशाने डॉक्टर असलेल्या जीशानने शुमैलाला तिच्या आयुष्याबद्दल आणि भाषा कौशल्याबद्दल प्रश्न विचारले. "माझ्या वडिलांना १४ भाषा येतात आणि त्यांनी मला घरी सहा भाषा शिकवल्या. मी शाळेत जात नाही, पण मी घरीच अभ्यास करते, असे शुमैलाने सांगितले.
शुमैलाच्या या कथेमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेकांनी तिच्या प्रतिभेचे कौतुक केले, तर काहींनी अशा होनहार मुलाला शिक्षणाची योग्य संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. या व्हिडिओमध्ये शुमैला वेगवेगळ्या भाषेत बोलताना आणि पर्यटकांशी संवाद साधताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शुमैलाने आपल्या कुटुंबाबद्दल सांगितले की, तिच्या वडिलांना पाच बायका आहेत आणि ३० भावंडांसह राहतात. हे ऐकून लोक आश्चर्यचकित झाले.
संबंधित बातम्या