डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असून, आता त्यांच्या पुढील नितीची जगाला उत्सुकता आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान जागातील वेगवेगळ्या देशात सुरू असलेली युद्ध संपवण्यापासून ते बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यापर्यंत अनेक दावे केले. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी संबंधित एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये बुरखा घातलेली एक तरुणी आपण ट्रम्प यांचे खरे अपत्य असल्याचा दावा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
ट्रम्प यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. हा व्हिडिओ Siasat.pk डिसेंबर २०१८ मध्ये पोस्ट केला होता. त्यावेळी या व्हिडिओकडे फारसे लक्ष गेले नव्हते. मात्र, ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयानंतर अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सनी हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
'घर के कैलाश' या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ रिपोस्ट करण्यात आला आहे. ज्याला जवळपास साडेपाच लाख वेळा पाहिलं गेलं असून ही संख्या सातत्याने वाढत आहे.
या व्हिडिओमध्ये ती महिला उघडपणे दावा करत आहे की, ती डोनाल्ड ट्रम्प यांची खरी मुलगी आहे. ती उर्दूमध्ये स्वत:ची ओळख करून देते आणि स्वतःला मुस्लिम आणि पंजाबी दोन्ही म्हणवते. मग ती एक धक्कादायक दावा करते- ती दावा करते की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे तिचे खरे वडील आहेत. ती पुढे म्हणते की ट्रम्प यांनी एकदा तिच्या आईला "बेजबाबदार" म्हटले होते. ट्रम्प आपली योग्य काळजी घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 'माझे वडील ट्रम्प हे मनाने आणि स्वभावाने चांगले नाहीत, असेही तिने म्हटले आहे
हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोकांच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत. काही युजर्स या व्हिडिओला व्यंग्य म्हणत आहेत, तर काही जण त्यांची चर्चेसाठी हा व्हिडिओ आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला अनेकजण फेक देखील म्हणत आहेत.
एका युजरने कमेंट केली की, "फक्त पाकिस्तानमध्येच तुम्हाला अशी व्यक्ती सापडेल जी इतक्या आत्मविश्वासाने ट्रम्प यांना आपले वडील म्हणत आहे!" दोघांचेही अभिनंदन!