Pakistan Terrorist Attack : पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांनी हादरले आहे. या दहशतवादी हल्यात तब्बल ५० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील कुर्रम या भागात एका प्रवासी व्हॅनवर हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी व्हॅनवर अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वायव्य पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृतांचा आकडा ५० वर पोहोचला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. हा हल्ला गेल्या काही वर्षांतील या भागातील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात शिया मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे आणि अलीकडच्या काही महिन्यांत शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये या परिसरात तीव्र जातीय संघर्ष निर्माण झाला यह . या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस पाराचिनारहून पेशावरला जात होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ८ महिला आणि ८ मुलांसह ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये बहुतांश शिया मुस्लिम होते.
स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबाननियंत्रित भागात हा हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताफ्यात २०० पेक्षा धिक वाहने होती. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या हल्ल्याच्या तपासासाठी उच्चस्तरीय शिष्टमंडळ कुरामला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रांतीय कायदामंत्री, प्रादेशिक आमदार आणि मुख्य सचिवांचा समावेश आहे. राज्यातील सर्व रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी महामार्ग पोलिस युनिट स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गंडापूर यांनी शोकसंतप्त कुटुंबियांचे सांत्वन केले असून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे अत्यंत निंदनीय आणि निंदनीय आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले