मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan Arrest : इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, एका तासात त्यांना कोर्टात घेऊन या; पाक सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Imran Khan Arrest : इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, एका तासात त्यांना कोर्टात घेऊन या; पाक सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 11, 2023 06:10 PM IST

Pakistansupremecourt : इम्रान खानयांना केलेली अटकबेकायदेशीय आहे. त्यांना एक तासाच्या आता कोर्टासमोर हजर करा, असे आदेश पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

Imran khan 
Imran khan  (REUTERS)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयात त्यांच्या अटकेच्या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. यावेळी कोर्टाने म्हटले की, इम्रान खान यांना केलेली अटक बेकायदेशीय आहे. त्यांना एक तासाच्या आता कोर्टासमोर हजर करा. चीफ जस्टिस उमर अता बंदियाल यांनी इमरान खान यांना न्यायालयाच्या परिसरातून अटक केल्याच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले की, जर कोणी न्यायालयात आला असेल तर त्याला तेथून कशी काय अटक केली जाऊ शकते. चीफ जस्टिस यांनी म्हटले की, हे न्यायाच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. न्यायालयाच्या आवारात अटक करणे ही धोकादायक पद्धत आहे. असेच सुरू राहिले तर न्यायालयात कोणीही सुरक्षित अनुभव करू शकणार नाही. 

इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशाविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इम्रान खान यांची अटक वैध ठरवणारा इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णयाविरोधात इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. 

पीटीआयने आपल्या याचिकेत म्हटले होते की, उच्च न्यायालयाचा हा आदेश पाकिस्तानी घटनेच्या कलम १० अ च्या विरोधात आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय विरोधाभासांनी भरलेला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. एनएबीचे अध्यक्षांनी जारी केलेले वॉरंट बेकायदेशीर आहे,  असंही यात म्हटलं आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अल कादिर ट्रस्ट भ्रष्ट्राचार प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यांना इस्लामाबाद न्यायालयाच्या आवारातून उचलण्यात आले होते. इम्रान खान यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) आणि पाक रेंजर्सनी ओढत नेऊन व्हॅनमध्ये बसवले होते. त्यावेळी त्यांना टॉर्चर केल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला होता. यावेळी इम्रान यांच्या वकिलालाही मारहाण झाली होती. यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता. पीटीआयचे समर्थक लष्कराच्या मुख्यालयात घुसले होते. सर्व शहरात आंदोलन करण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग