मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian in Pak Jail: पालघर जिल्ह्यातील ३० तरुणांची कराची जेलमधून सुटका

Indian in Pak Jail: पालघर जिल्ह्यातील ३० तरुणांची कराची जेलमधून सुटका

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 16, 2023 08:43 PM IST

पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर राहणारे ३० आदिवासी तरुण मासेमारी करताना पाकिस्तानच्या समुद्री हद्दित शिरले होते. गेल्या दोन वर्षानंतर आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. Pakistan released Indian fishermen from Jail

पालघर जिल्ह्यातील ३० तरुणांची पाकिस्तानच्या जेलमधून सुटका
पालघर जिल्ह्यातील ३० तरुणांची पाकिस्तानच्या जेलमधून सुटका

गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर मच्छिमारी करत असताना चुकून पाकिस्तानच्या समुद्री हद्दीत प्रवेश केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेल्या ६०० मच्छिमारांची नुकतीच कराची जेलमधून सुटका करण्यात आली.. यात पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या ३० मच्छिमारांचा समावेश आहे. १३ मे रोजी पहिल्या गटात सुटका झालेल्या मच्छिमारांमध्ये पालघर जिल्ह्यातील ०५ मच्छिमारांना समावेश असून मच्छिमार तरुणांच्या सुटकेच्या वृत्ताने येथे आनंदाचे वातावरण आहे. डहाणूचे आमदार विनोद निकोले तालुक्याती मच्छिमारांच्या सुटकेचे स्वागत केले आहे.

पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी तालुक्यातील आदिवासी तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळत नसल्याने रोजगारासाठी शोधात लगतच्या गुजरातमध्ये जात असतात. यातील काही तरुण गुजराती मच्छिमारांसोबत बोटीवर खलाशी म्हणून काम करतात. परंतु समुद्रात मासेमारी करत असताना अनवधानाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश झाल्यामुळे पाकिस्तानी कोस्ट गार्डकडून त्यांना अटक करून जेलमध्ये डांबून ठेवले जाते. सध्या ६६६ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानच्या विविध तुरुंगात डांबून ठेवले असल्याची माहिती आहे.

गोव्यामध्ये नुकत्याच झालेल्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या (SCO) बैठकीत सामील होण्यासाठी आलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी भारत-पाकिस्तान संबंधातील सदभावनेचं प्रतिक म्हणून पाकिस्तानच्या जेलमधून ६०० भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाकिस्तान सरकारच्या गृह मंत्रालयाकडून जारी पत्रानुसार कराचीतील मलिर तुरुंगात असलेल्या २०० भारतीय मच्छिमारांचा पहिला गट ११ मे २०२३ रोजी सोडण्यात आला. तर २०० मच्छिमारांचा समावेश असलेला दुसरा गट २ जून रोजी आणि १०० मच्छिमारांचा समावेश असलेला तिसरा गट ३ जुलै रोजी सोडण्यात येणार आहे. हे सर्व मच्छिमार वाघा बॉर्डरमार्गे भारतात प्रवेश करणार आहेत.

पाकिस्तानात अटकेत असलेल्या पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यासाठी आमदार विनोद निकोले यांनी डिसेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या