मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग; पाकिस्तानचे पित्त खवळले

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग; पाकिस्तानचे पित्त खवळले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2024 11:39 AM IST

pakistan on ram mandir : अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी अभिषेक सोहळा पूर्ण झाला. या दिमाखदार कार्यक्रमात सुमारे ७ हजार पाहुणे सहभागी झाले होते. दरम्यान, या कार्यक्रमामुळे शेजारी पाकिस्तानचे पित्त खवळले आहे. या सोहळ्याच्या निषेध करत भारताला लोकशाही शिकवत संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली आहे.

Ram_Mandir
Ram_Mandir

pakistan on ram mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखात पार पडला. या दिमाखदार कार्यक्रमात सुमारे ७ हजार पाहुणे सहभागी झाले होते. दरम्यान, या कार्यक्रमामुळे शेजारी पाकिस्तानचे पित्त खवळले आहे. या सोहळ्याचा निषेध करत पाकिस्तानने भारतातील वाढत्या 'हिंदुत्व विचारसरणी'ला शांततेसाठी 'धोका' असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतातील मुस्लिम धर्मियांचे धर्मस्थळे वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचे दरवाजे आजपासून सर्वांसाठी खुले! अशा प्रकारे घेता येईल रामलल्लाचे दर्शन

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक्सवर प्रसिद्धी पत्रक पोस्ट करण्यात आले आहे. “भारतामधील अयोध्या शहरातील बाबरी मशीद पाडून त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या राम मंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आम्ही निषेध करतो”, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने ही टिप्पणी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समारंभात अयोध्येच्या भव्य राम मंदिरात राम लल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक केल्यानंतर केली. पाकिस्तानने मंदिराच्या बांधकामाचा आणि अभिषेक सोहळ्याचा निषेध केला आहे. हा सोहळा भारतातील लोकशाहीच्या चेहऱ्यावर लागलेला काळा डाग आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Maharashtra Weather Update : विदर्भात आज अवकाळी पावसाची शक्यता! थंडीत होणार वाढ, मुंबई, पुण्यात गारठा वाढला

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की, 'गेल्या ३१ वर्षांच्या घटनांनंतर आजचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भारतातील वाढत्या बहुसंख्यवादाचे हे उदाहरण आहे. भारतीय मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या उपेक्षित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. 'भारतातील 'हिंदुत्वा'ची वाढती विचारसरणी धार्मिक सलोखा आणि प्रादेशिक शांततेला धोका निर्माण करणारी आहे.'

पाकिस्तानने या पत्रकाच्या माध्यमातून भारतातील मुस्लीम समुदाय आणि अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळांना सुरक्षा पुरविण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानकडून भारताला फुकटचे सल्ले देण्यात येत असले तरी मानव अधिकार संस्थांच्या मतानुसार, उलट पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी यासारख्या धार्मिक अल्पसंख्याकांवर मोठे अत्याचार होत आहे. सामाजिक बहिष्कार, मर्यादित संधी आणि हिंसाचार या घटना पाकिस्तानात वाढल्या आहेत.

WhatsApp channel