pakistan quetta blast : पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात २० जण ठार झाले आहे. तर २४ पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुटण्यापूर्वी तिकीट काऊंटरजवळ प्रचंड गर्दीत हा स्फोट झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. क्वेटा शहरात दोन स्फोट झालेआहेत. दुसऱ्या स्फोटात १५ जण जखमी झाले. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पाकिस्तानात अशा प्रकारच्या दहशतवादी घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हा आत्मघातकी हल्ला असल्याचे दिसत आहे. मात्र, याबाबत आता स्पष्ट सांगणे योग्य ठरणार नाही. या घटनेचा तपास सुरू आहे. स्फोटाच्या वेळी जवळपास १०० स्थानकावर होते. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळच्या रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली असून जखमींवर प्राध्यान्याने उपचार केले जात आहेत.
नुकताच उत्तर वझिरीस्तान भागात बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात चार सुरक्षा रक्षक शहीद झाले होते. यानंतर खैबर पख्तुनख्वाजवळ स्फोट झाला. यात चार मुलांचाही मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी बलुचिस्तानमधील एका शाळेजवळ स्फोट झाला होता, ज्यात पोलिसांसह शाळेतील पाच मुलांचा मृत्यू झाला होता. पोलिओ लासीच्या वाहनांनाही दररोज लक्ष्य केले जाते.
व्हॉट्सॲप ग्रुप तयार करायचा असेल तर सरकारला द्यावी लागणार लायसन्स फी! 'या' देशातील अजब नियमाची जगभर चर्चा