पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलायन्स (PIA) ची एक हवाई सुंदरी (Air Hostess) सोमवारी कॅनडामधून अचानक गायब झाली आहे. एअर होस्टेस मरियम रजा इस्लामाबादहून PIA चे विमान PK-782 तून टोरंटो पोहोचली होती. मात्र परतताना ती ड्यूटीवर आली आहे. जेव्हा अधिकाऱ्यांनी कॅनडातील हॉटेलवर झडती घेतली तेव्हा हॉटेलच्या खोलीत तिचा यूनिफॉर्म व 'Thank You PIA' लिहिलेली नोट मिळाली.
इस्लामाबादहून टोरंटो जाणाऱ्या फ्लाइटमधील आणखी एक एअर होस्टेस कॅनडातन बेपत्ता झाली आहे. मरियम रजा असे तिचे नाव होते. ती PIA साठी काम करत होती. २६ फेब्रवारी रोजी फ्लाइट PK782 मधून ती टोरंटोला पोहोचली मात्र परतीच्या प्रवासाला ती ड्युटीवर हजर झाली नाही.
एअर होस्टेस मरियम १५ वर्षापासून पीआयएमध्ये काम करत होती. तिला इस्लामाबाद ते टोरंटो उड्डाणाचे काम सोपवले होते. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, यावर्षी कॅनडात उतरल्यानंतर PIA एअर होस्टेस गायब झाल्याची ही दुसरी घटना आहे.
आतापर्यंत १४ हवाई सुंदरी बेपत्ता -
यापूर्वी जानेवारी महिन्यात फैजा मुख्तार नावाची हवाई सुंदरी अशाच प्रकार अचानक गायब झाली होती. पीआयएने सांगितले की, फ्लाइट टोरंटोमध्ये लँड केल्यानंतर फैजा परतली नव्हती. त्याचबरोबर २०२३ मध्ये ७ एअर होस्टेस अशाच प्रकारे गायब झाल्या होत्या. २०२२ मध्ये ५ केबिन क्रू बेपत्ता होते.
PIA अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅनडात शरण घेऊन तेथील नागरिकता घेणे खूप सोपे आहे. या कारणामुळे त्यांचा स्टाफ पाकिस्तानला परतण्यास इच्छुक नसतो. अधिकाऱ्याने सांगितले की, एक क्रू मेंबर ड्यूटी दरम्यान पळून गेला होता तो आता कॅनडात स्थायिक झाला. तसेच तो अन्य स्टाफलाही तसाच सल्ला देत आहे.