मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran khan: मला एक दिवस आधीच हल्ल्याबाबत कल्पना, ‘या’ ठिकाणी रचला कट; इम्रान खान यांच्या गौप्यस्फोट
इम्रान खान
इम्रान खान

Imran khan: मला एक दिवस आधीच हल्ल्याबाबत कल्पना, ‘या’ ठिकाणी रचला कट; इम्रान खान यांच्या गौप्यस्फोट

04 November 2022, 22:17 ISTShrikant Ashok Londhe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. आपल्यावर हल्ला होणार याची माहिती मला एक दिवस आधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयामधून देशवासीयांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, माझ्यावर हल्ला होणार हे मला एक दिवस आधी कळले होते. पायात चार गोळ्या लागल्याचेही इम्रान यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रमुखांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. पंजाब प्रांतातील वजिराबाद येथे निषेध मोर्चा दरम्यान झालेल्या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायात गोळी लागली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून किमान १० जण जखमी झाले आहेत. आपल्या भाषणादरम्यान इम्रान म्हणाले की, मी हल्ल्याचा तपशील नंतर देईन. पण मला एक दिवस आधी हल्ल्याबाबत कळले की त्यांनी मला वजिराबादमध्ये मारण्याची योजना आखली होती.

गुरुवारी दुपारच्या सुमारास पाकिस्तानच्या वझिराबादमधील झफर अली खान चौकात इम्रान खान यांच्या पक्षाचा ‘हकीकी आझादी मोर्चा’ पोहोचला होता. हा मोर्चा मुख्य चौकात आल्यानंतर अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आला आणि घटनास्थळी एकच खळबळ उडाली. लोकांची पळापळ सुरू झाली. या गोंधळात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे रवाना केलं. यावेळी घटनास्थळीओळखून अटक केली.

पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांनी आपल्या भाषणात पीएमएल-एन आणि पीपीपीवर जोरदार निशाणा साधला. दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून देशाचे कर्ज वाढवले,असे ते म्हणाले.

 

 

विभाग