मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतात पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर बंदी

भारतात पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर बंदी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 01, 2022 11:00 AM IST

Pakistan Govt Twitter Account Block: ट्विटरने या कारवाईबाबत सांगितले की, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटसंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (AP)

Pakistan Govt Twitter Account Block: भारताने पाकिस्तान सरकारची ट्वटिरवर नाकाबंदी केली आहे. पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आलं आहे. भारतीय ट्विटर युजर्सना आता हे अकाउंट ब्लॉक केलं आहे. ट्विटरने या कारवाईबाबत सांगितले की, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटसंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या.

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटव अलिकडेच पीएफआय संदर्भात ट्विट केलं गेलं होतं. भारतात पीएफआय़वर पाच वर्षांची बंदी घातल्यानंतर त्याविरोधात पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करण्यात आलं होतं. त्यामुळेच ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

देशभरात राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयांवर आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकले होते. त्यानंतर शेकडो पदाधिकाऱ्यांना अटकही केली गेली. यानंतर तपास संस्थांनी गृहमंत्रालयाला पीएफआयबाबत अहवाल पाठवत बंदीची शिफारस केली. यानतंर केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांची बंदी घातली आहे.

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर कशाबद्दल कारवाई करण्यात आली याची अधिकृत माहिती केंद्र सरकारने अद्याप दिलेली नाही. मात्र पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान सरकारच्या ट्विवटर अकाउंटवर देण्यात आलेल्या प्रतिक्रियेनंतर ही पावले उचलली असल्याचं सांगितलं जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग