पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान; नवाझ शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान; नवाझ शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता

पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान; नवाझ शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता

Feb 08, 2024 08:15 AM IST

Pakistan elections 2024 : पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या साठी आज मतदान केले जाणार असून उमेदवारांचे भवितीव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

pakistan elections 2024
pakistan elections 2024 (PTI)

Pakistan elections 2024 : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लष्कराचा पाठिंबा असल्याचे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बुधवारीही हिंसाचाराच्या घटना घडल्या. बलुचिस्तान प्रांतात निवडणूक कार्यालयांना लक्ष्य करून झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात तब्बल ३० नागरिक ठार झाले. तर ४० हून अधिक जखमी झाले. माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात असल्याने शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. खान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह क्रिकेट 'बॅट' काढून घेतले आहे.

Maharashtra Weather update : राज्यात उन पावसाचा खेळ! विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा इशारा, असे असेल हवामान

पाकिस्तानमध्ये मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुकांचे वेळापत्रक जारी केले होते. त्यानुसार आज मतदान होणार आहे. या साठी पाकिस्तानात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुमारे ६,५०,००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ईव्हीएम चोरी भोवली! निवडणूक आयोगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि डीवायएसपीला केले निलंबित

१२.८५ कोटीहून अधिक मतदार बजावणार हक्क 

या निवडणुकीत १२.८५ कोटीहून अधिक नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. 'रेडिओ पाकिस्तान'च्या बातमीनुसार, मतदारांच्या सुरक्षेसाठी सुमारे ६,५०,००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस, नागरी सशस्त्र दल आणि सशस्त्र दलाच्या जवानांचा समावेश आहे. आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) मते, नॅशनल असेंब्लीसाठी ५,१२१ उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात ४८०७ पुरुष तर ३१२ महिला आणि दोन ट्रान्सजेंडर उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर चार प्रांतीय विधानसभांसाठी १२,६९५ उमेदवार रिंगणात आहेत, त्यात १२,१२३ पुरुष, ५७० महिला आणि दोन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.

NCP Crisis : पुण्यात राजकारण तापलं; राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील ‘घड्याळ’ हटवलं, नेत्याला अश्रू अनावर

एका ECP अधिकाऱ्याने सांगितले की, पीठासीन अधिकारी, ज्यांना आधीच दंडाधिकाऱ्यांचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत, ते मतदान साहित्य पोलीस आणि लष्कराच्या संरक्षणाखाली मतदान केंद्रांवर घेऊन जातील. आयोगाच्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये सर्वाधिक ७,३२,०७,८९६ नोंदणीकृत मतदार आहेत, त्यानंतर सिंधमध्ये २,६९,९४,७६९ खैबर पख्तूनख्वामध्ये २,१९,२८,११९, बलुचिस्तानमध्ये ५३,७१,९४७ आणि राजधानी इस्लामाबादमध्ये १० मतदार आहेत. ECP ने देशभरात मतदानासाठी ९,०७,६७५ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत, ज्यात पुरुष मतदारांसाठी २५,३२०, महिलांसाठी २३,९५२ आणि इतर ४१,४०३ मिश्र मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ४४,००० मतदान केंद्रे सामान्य आहेत, तर २९,९८५ संवेदनशील आणि १६,७६६ अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

नवाज शरीफ यांचा विजय निश्चित

नवाज शरीफ यांचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात आहे. कारण त्यांना लष्करचा पाठिंबा आहे. असे झाल्यास ते चौथ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होतील. या स्पर्धेत बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चाही समावेश आहे. बिलावल भुट्टो-झरदारी यांना पक्षाने पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने बुधवारी आरोप केला की, ८ फेब्रुवारीच्या निवडणुकीत आपल्या मर्जीचे सरकार स्थापन करण्यासाठी पाकिस्तानमध्ये राजकीय संगनमताने निवडणुका लढवल्या जात आहेत. पीटीआयचे प्रवक्ते रऊफ हसन यांनी बुधवारी सांगितले की, खान यांच्या पक्षाला निवडणूक जिंकू नये यासाठी अनेक पक्ष विरोधी कारवाया केल्या जात आहेत. या मागे लष्कर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, पाकिस्तान कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी झालेल्या हिंसक घटनांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांनी चिंता व्यक्त केली होती.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर