Bilawal Bhutto Goa Visit : तब्बल १२ वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारताच्या दौऱ्यावर, गोव्यातील समिटमध्ये होणार सहभागी
Bilawal Bhutto On India Visit : यापूर्वी २०१२ साली पाकिस्ताच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार या दिल्लीच्या दौऱ्यावर आल्या होत्या.
Bilawal Bhutto On India Visit : स्वातंत्र्यापासून भारत आणि पाकिस्ताचे संबंध नेहमीच खराब राहिलेले आहे. सीमावाद आणि काश्मिर प्रश्नांवरून दोन्ही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच संघर्ष सुरू असतो. परंतु अनेकदा दोन्ही देशांनी वैर विसरून एकत्र येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. त्यातच आता पाकिस्तानाचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी हे दोनदिवसीय भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. गोव्यातील पणजीत होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटमध्ये बिलावल भुट्टो सहभागी होणार आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांना गोव्यातील समिटसाठी आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता ते पाकिस्तानातून सरकारी विमानाने गोव्यात दाखल झाले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
तब्बल १२ वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारताच्या दौऱ्यावर...
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्याआधी २०१२ साली पाकिस्तानच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार या दिल्लीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानचा दौरा करत तात्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यामुळं जवळपास एका दशकानंतर दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये भेट होत असल्यामुळं भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारणार असल्याची चर्चा आहे. बिलावल भुट्टो दोन दिवस समिटमध्ये सहभागी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये परतणार आहेत.
Sharad Pawar : राष्ट्रवादीतील भूकंपाचे हादरे दिल्ली-चेन्नईपर्यंत; राहुल गांधी, स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन
दक्षिण आशियातील देशांचे प्रतिनिधी गोव्यातील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटसाठी भारतात दाखल झाले आहे. या समिटसाठी भारताने पाकिस्तानलाही आमंत्रण दिलं होतं. भारताच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्यासोबत एक प्रतिनिधी मंडळ भारतात पाठवलं आहे. दक्षिण आशियातील शांती, व्यापार आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटमध्ये चर्चा होणार आहे.