Pakistan Election Result: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागील २४ तासाहून अधिक वेळेपासून मतमोजणी सुरू आहे. तुरुंगात कैद असलेल्या माजी पंतप्रधानइम्रान खान यांचा पक्षपीटीआय समर्थित अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
दरम्यान माजी पंतप्रधान नवाज शरीफयांनी दावा केला आहे की, पीएमएल-एन सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे अन्य पक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा त्यांनी केला आहे. नवाजशरीफ शुक्रवार रात्री लाहोरमधील पीएमएल-एन मुख्यालयात दाखल झाले व त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे प्रमुख नवाज शरीफ यांनी म्हटले की, या निवडणुकीत त्यांचा पक्ष'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आली आहे. त्यांनी म्हटले की, पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर निवडणूक आयोगाने निवडणूक लढण्यावर बंदी घातली आहे. यामुळे बहुतांश उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात अनेकअपक्ष निवडून आल्याने पाकिस्तानचे भविष्य अपक्षांच्या हाती असणार आहे.
लाहोरमधील पक्षा मुख्यालयात पक्षकार्यकर्त्यांनी संबोधित करताना नवाज शरीफ यांनी म्हटले की, आमची पार्टी सर्वात मोठी पार्टी म्हणून उदयास आली आहे मात्र बहुमतापासून दूर आहे.आम्ही जनादेशाचा आदर करतो. देशाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी पीएमएल-एनची आहे. आम्ही नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी अपक्ष आणि इतर पक्षातील नेत्यांना विनंती करतो की, देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्हाला शेजारी देशाबरोबरच अन्य देशांशी संबंध सुधारायचे आहेत. आम्हाला कोणाशीही लढायचे नाही, पाकिस्तान सध्या कोणाशीही लढण्याच्या स्थितीत नाही.