मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Video : पाकिस्‍तानमधील निवडणूक प्रचाराची जगभर चर्चा; नवाज शरीफ यांच्या रॅलीत आणले खरेखुरे वाघ अन् सिंह

Video : पाकिस्‍तानमधील निवडणूक प्रचाराची जगभर चर्चा; नवाज शरीफ यांच्या रॅलीत आणले खरेखुरे वाघ अन् सिंह

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 25, 2024 04:39 PM IST

lion and tiger at a political rally : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लाहोरमधील निवडणूक प्रचार सभेच चक्क वाघ व सिंह आणल्याचा प्रकार समोर आले आहे.

real lion and tiger in Nawaz sharif rally
real lion and tiger in Nawaz sharif rally

पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफयांच्या नेतृत्वातील पीएमएलएन पक्ष सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात असून पक्षाकडून अनेक प्रचारसभा, रॅली केल्या जात आहेत. नवाज शरीफ यांच्यासोबतच त्यांची मुलगी मरियम नवाज आणि भाऊ शाहबाज शरीफही प्रचारात सक्रीय आहेत. पाकिस्तानमधील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या नवाज शरीफ यांची मंगळवारी लाहोरमध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अशी एक घटना घडली, ज्याची चर्चा पाकिस्तानमध्येच नव्हे तर जगभरात होत आहे. या रॅलीत एक वाघ व सिंह आणण्यात आला होता.

लाहोरमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रचार सभा होती. या सभेसाठी प्रमुख आकर्षण होते सिंह. नवाज शरीफ आणि मरियम यांच्या प्रचारसभेसाठी पिंजऱ्यात बंद एका खऱ्याखुऱ्या सिंहाला आणले गेले. एका गाडीतून आणलेल्या सिंहाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. प्रचारसभेसाठी सिंह आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज म्हणजे पीएमएल-एन पक्षाचे निवडणूक चिन्ह सिंह आहे. यातच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या खुऱ्या सिंहालाच प्रचारसभेसाठी आणले.

८ फेब्रवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नवाज शरीफ लाहोरमधील एन-१३० मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पीएमएलएनचे निवडणूक चिन्ह सिंह आहे तसेच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवाज शरीफसाठी 'कौन आया, शेर आया' घोषणाही खूप लोकप्रिय आहे. मंगळवारच्या प्रचारसभेला केवळ सिंहच नाही तर वाघही आणला गेला. मात्र आणताना वाघ जखमी झाल्याने त्याला परत वाढवले गेले. मात्र सिंह रॅलीत सामील झाला होता. पिंजऱ्यात बंद असलेल्या सिंहासोबत लोकांनी अनेक फोटो काढले.

नवाज शरीफ चौथ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. मागील निवडणूक जिंकणारे इम्रान खान सद्या तुरुंगात आहेत तसेच पाकिस्तान पीपुल्स पार्टीही इतकी मजबूत राहिली नाही. यामुळे नवाज शरीफ यांच्या विजयाची शक्यता दिसत आहे. तसेच म्हटले जात आहे की, यावेळी नवाज शरीफयांना पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचा विजय सोपा वाटत आहे.

WhatsApp channel

विभाग