मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan Election : मतदान सुरु असतानाच पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, ४ पोलीस ठार

Pakistan Election : मतदान सुरु असतानाच पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, ४ पोलीस ठार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 08, 2024 07:48 PM IST

Pakistan Election 2024 : मतदानादरम्यान वायव्य पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेले चार पोलीस ठार झाल्याची माहिती आहे.

Pakistan Election 2024
Pakistan Election 2024

पाकिस्तानमध्ये छोठ्या मोठ्या हिंसाचार तसेच बॉम्बस्फोटाच्या घटनानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. आता सुरुवातीचे कल येण्यास सुरूवात झाली आहे. डॉनने रेडिओ पाकिस्तानच्या हवाल्याने सांगितले की, जे मतदार मतदान केंद्र बंद होण्यापूर्वी रांगेत उभे होते त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मकरानचे पोलीस आयुक्त आयुक्त सईद अहमद उमरानी यांनी रॉयटर्सला सांगितले की, बलूचिस्तानमधील विविध भागात ग्रेनेड हल्ला झाल्याचे वृत्त आहे. मात्र याचा मतदानावर काही परिणाम झाला नाही. मतदाना दरम्यान वायव्य पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेले चार पोलीस ठार झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानमध्ये आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत मुख्य लढत नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन, बिलावल भुट्टो झरदारी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि इम्रान खान यांची पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ यांच्यात आहे. या निवडणुकीत पाकिस्तानी लष्कर उघडपणे नवाझ शरीफ यांच्या पाठीशी उभे असल्याचे मानले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीचे मतदान सुरू असताना खैबर पख्तनुख्वा विभागातील डेरा इस्माइल खान जिल्ह्याच्या कुलची परिसरात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला.  एका व्यक्तीने हातबॉम्ब फेकून नंतर बेछूट केलेल्या गोळीबारात चार पोलीस कर्मचारी ठारी झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाची वाहने उभी असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर तेथील पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग