मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan Stampede : पाकिस्तानमध्ये मोफत रेशन वाटताना चेंगराचेंगरी, ३ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
Pakistan Stampede
Pakistan Stampede

Pakistan Stampede : पाकिस्तानमध्ये मोफत रेशन वाटताना चेंगराचेंगरी, ३ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

31 March 2023, 23:04 ISTShrikant Ashok Londhe

Pakistan economic food crisis : पाकिस्तानमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात मोफत रेशन वाटप करताना मोठी दुर्घटना घडली आहे. रेशन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्लामाबाद –पाकिस्तानमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात मोफत रेशन वाटप करताना मोठी दुर्घटना घडली आहे. रेशन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना कराचीमधील एका कारखान्यात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी येथे मोफत रेशन वाटले जात होते. त्यामुळे लोकांची गर्दी जमली होती. प्रत्येक वर्षी रमजानच्या महिन्यात येथे रेशनचे वाटप केले जाते. पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये ३ मुले व ८ महिलांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ही घटना कराची शहराच्या SITE (सिंध इंडस्ट्रियल ट्रेडिंग इस्टेट) परिसरात घडली. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान सरकारने कराचीमध्ये मोफत रेशन वितरण मोहीम सुरू केल्यानंतर, येथील सरकारी वितरण केंद्रावर लोकांची मोठी गर्दी केली होती. यानंतर हा प्रकार घडला.

पाकिस्तानमध्ये गव्हाचे दर गगनाला भिडले आहेत. गरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र रमजानच्या महिन्यात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी अनेक संस्था मोफत रेशन वाटण्याचे काम करत आहेत. कराचीमध्ये शुक्रवारी मोफत रेशन वाटले जात होते. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. आट्याच्या गोण्या कमी होत्या आणि लोकांची गर्दी अधिक. प्रत्येकाला सामान हवे होते त्यातूनच ही चेंगरचेंगरी झाली. महिला व मुला जमिनीवर पडली आणि लोक त्यांना तुडवत पुढे जाऊ लागली. यामुळे ३ मुले व ८ महिलांचा मृत्यू झाला.

यापूर्वी, गेल्या आठवड्यात पाकिस्तान सरकारने पंजाब प्रांतात मोफत पीठ वितरण केले होते. त्यावेळीही अशाच प्रकारची चेंगराचेंगरी झाली होती. त्यात चार वृद्धांचा मृत्यू झाला होता.

विभाग