मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शस्त्रास्त्रे व दारूगोळा हाताळणारे पाक सैनिक हातात घेणार नांगर, कुदळ अन् फावडे, काय आहे प्रकरण?
पाक सैनिक हातात घेणार नांगर
पाक सैनिक हातात घेणार नांगर

शस्त्रास्त्रे व दारूगोळा हाताळणारे पाक सैनिक हातात घेणार नांगर, कुदळ अन् फावडे, काय आहे प्रकरण?

17 March 2023, 17:44 ISTShrikant Ashok Londhe

Pakistan army corporate farming : पाकिस्तानमधील पंजाब सरकारने आर्मीला ४५ हजार एकर जमीन दिली आहे. त्यामध्ये ते 'कॉर्पोरेट एग्रीकल्चर फार्मिंग' करणार आहेत.

Pakistan Army News : भारताचा शेजारी पाकिस्तान सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. पाक जनतेचे परिस्थितीत दिवसेंदिवस खराब होत आहे. दरम्यान माजी पंतप्रधान इम्रान खान प्रकरणात जगभरातून पाकवर टीका होत आहे. पाकिस्तानी जनता दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठी पाकला आयएमएफ आणि जगातील अन्य देशांसमोर हात पसरावे लागत आहेत. संकटांची अशी मालिकाच सुरू असताना हातात दारूगोळा व शस्त्रे घेणारे पाकिस्तानी सैनिकांनी आता शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील पंजाब सरकारने आर्मीला ४५  हजार एकर जमीन दिली आहे. त्यामध्ये ते 'कॉर्पोरेट एग्रीकल्चर फार्मिंग' करणार आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानी लष्कर जगभरात अनेकवेळा बदनाम झाली आहे. भारताविरुद्धच्या लढाईतही पाकला अनेकवेळा शरणागती पत्करावी लागली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तानी लष्कराला शेती करण्याची परवानगी यासाठी दिली आहे, जेणेकरून कृषी उत्पादनात वाढ होऊ शकेल. हा संपूर्ण प्रकल्प ज्वाइंट व्हेंचरमध्ये असेल. सशस्त्र दलांच्या सूत्रांनी सांगितले की, योजना यशस्वी करण्यासाठी लष्कर व्यवस्थापन करेल. दरम्यान जमिनीची मालकी प्रादेशिक सरकारकडे राहील. लष्कराला कॉर्पोरेट फार्मिगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात काहीही हिस्सा मिळणार नाही. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पंजाब सरकारच्या भक्कर, खुशाब आणि साहीवाल जिल्ह्यातील ४५,२६७ एकर जमिनीवर कॉर्पोरेट कृषी योजना सुरू केली जाईल. हा प्रकरल्प अनेक टप्प्यात पूर्ण केला जाईल.

पाकिस्तानी वेबसाइट जिओ टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अन्न सुरक्षा आणि शेतजमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी लष्कर दरवर्षी भूमिका बजावते.  भूतकाळात काराकोरम महामार्गाच्या बांधकामासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांमध्येही लष्कराचा सहभाग होता. आता कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आपली भूमिका बजावण्याचे ठरवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पात कॉर्पोरेट कंपन्याही सहभागी होणार आहेत. प्रकल्पांतर्गत, पंजाब सरकारची नापीक आणि कमी लागवडीची जमीन कॉर्पोरेट शेतीसाठी वापरली जाईल. आधुनिक आणि यांत्रिक शेतीसाठी स्थानिक लोकांना प्रकल्पाचा भाग बनवले जाईल.

जमीन लागवडीयोग्य बनवणे मोठे आव्हान - 
हा प्रकल्प अतिशय आव्हानात्मक मानला जातो, कारण जमीन लागवडी योग्य करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे हे मोठे काम असेल. ८ मार्च २०२३ रोजी पंजाब सरकारसोबत संयुक्त उद्यम व्यवस्थापन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. करारानुसार, पंजाब सरकार आपल्या राज्यातील ४५,२६७ एकर जमीन कॉर्पोरेट कृषी शेतीसाठी लष्कराला सुपूर्द करेल.