मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan Crisis : पाकची आर्थिक स्थिती श्रीलंकेच्या मार्गावर.. कांदे-टोमॅटोचे दर ऐकून बसेल धक्का!
पाकची आर्थिक स्थिती श्रीलंकेच्या मार्गावर
पाकची आर्थिक स्थिती श्रीलंकेच्या मार्गावर

Pakistan Crisis : पाकची आर्थिक स्थिती श्रीलंकेच्या मार्गावर.. कांदे-टोमॅटोचे दर ऐकून बसेल धक्का!

29 August 2022, 21:21 ISTShrikant Ashok Londhe

Pakistan Crisis : महागाईने पाकिस्तानची स्थिती श्रीलंके सारखी होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आयएमएफकडे बेलआउट पॅकेजची मागणी केली आहे.

पाकिस्तान सध्या खूप अडचणींचा सामना करत आहे. आधीपासूनच आर्थिक संकट त्यात तालिबानशी संघर्ष करत असलेल्या पाकिस्तानचे पुराने कंबरडे मोडले आहे.  यामुळे पाकिस्तानची जवळपास तीन कोटी जनता प्रभावित झाली आहे. मागील काही आठवड्यापासून आलेल्या पुराने  बलूचिस्तान, खैबर पख्तूनवा आणि सिंध प्रांतात हाहाकार माजला आहे. सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल समोर आले आहेत, त्यामध्ये लोक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात १ हजारहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. तर दीड हजाराहून अधिक नागरिक जखमी झाले आहे. त्यामुळे वाढलेल्या महागाईने पाकिस्तानची स्थिती श्रीलंके सारखी होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुराने विस्थापित झालेल्या नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी पैसे जमा करण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानी पंतप्रधानांसमोर आहे. आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आयएमएफकडे बेलआउट पॅकेजची मागणी केली आहे. 

पाकिस्तानमध्ये एकीकडे नैसर्गिक आपत्ती सुरु असताना महागाईचा आगडोंब उसळला आहे. भाज्या आणि फळांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करू शकते. 

पाकची राजधानी लाहोरमध्ये टोमॅटोचा भाव ५०० रुपये किलो तर कांद्याचा भाव ४०० रुपये किलो झाला आहे. तर १ किलो बटाटा १२० रुपयांवर पोहोचला आहे. पाकमध्ये खाद्यपदार्थांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. कांदा आणि टोमॅटोचा दर ७०० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Onion and tomato price increase)

अफगाणिस्तानमधून लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये टोमॅटो आणि कांद्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यातून पाकिस्तानची गरज पूर्ण होत नसल्याने पाकिस्तान भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करु शकतो. 

महागाईमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. जनतेमध्ये सरकारविरोधात रोष वाढत आहे. याचा उद्रेक कधीही होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा (Petrol-diesel Rate) भडका झाला आहे. त्यामुळे अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत.