Viral news : देश वाचवण्यासाठी कतरिनाशी संबंध ठेवशील का? पाकच्या नागरी सेवा परीक्षेतील प्रश्नाला तरुणाचं भन्नाट उत्तर-pakistan civil service mock interview asked question on katrina kaif viral on social media ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : देश वाचवण्यासाठी कतरिनाशी संबंध ठेवशील का? पाकच्या नागरी सेवा परीक्षेतील प्रश्नाला तरुणाचं भन्नाट उत्तर

Viral news : देश वाचवण्यासाठी कतरिनाशी संबंध ठेवशील का? पाकच्या नागरी सेवा परीक्षेतील प्रश्नाला तरुणाचं भन्नाट उत्तर

Sep 04, 2024 02:10 PM IST

Pakistan viral video : पाकिस्तान सिव्हिल सर्व्हिस मॉक इंटरव्ह्यूदरम्यान एका पाकिस्तानी तरुणाला अधिकारी होण्यासाठी असे प्रश्न विचारण्यात आले होते, जे सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेन्ट देखील दिल्या आहेत.

देशासाठी कतरिनाशी संबंध ठेवशील का? पाकिस्तान सिव्हिल सर्व्हिस मॉक इंटरव्ह्यूत विचारलेला प्रश्नाला तरूणाच भन्नाट उत्तर
देशासाठी कतरिनाशी संबंध ठेवशील का? पाकिस्तान सिव्हिल सर्व्हिस मॉक इंटरव्ह्यूत विचारलेला प्रश्नाला तरूणाच भन्नाट उत्तर

pakistan viral video : UPSC IAS-IPS परीक्षेच्या मुलाखतीत विचारलेले प्रश्न अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. भारतात यूपीएससी ही परीक्षा जगात कठीण मानली जाते. दरम्यान शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये देखील सरकारी अधिकारी होण्यासाठी पाकिस्तान सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याला विचारलेले प्रश्न व त्यानं दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑफिसर बनण्यासाठी मॉक इंटरव्ह्यू दरम्यान मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला पाकिस्तानी मुलाला चकित करणारे प्रश्न विचारले.

हे प्रश्न व मुलाने दिलेले उत्तर इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. मुलाला मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की, त्याला कोणती बॉलिवूड अभिनेत्री सर्वात जास्त आवडते? त्यानं हे उत्तर देतांना कतरिना कैफचं नाव घेतलं. त्याला पुढं विचारण्यात आलं की समजा भारताने पाकिस्तानवर अण्वस्त्र हल्ला करण्याची योजना आखली असेल आणि फक्त कतरिना कैफलाच याची माहिती असेल आणि ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कतरिनाशी संबंध निर्माण करावे लागेल तर तू काय करशील ?

पाकिस्तानच्या लष्करी परीक्षेची एक मॉक इंटरव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'वर्ल्ड टाइम्स फोर्सेस अकादमी' चालवणारे माजी पाकिस्तानी लष्करी अधिकारी सरमद मुहम्मद खान यांनी उमेदवार अली अब्बास यांना विचारले, "तुझी आवडती अभिनेत्री कोण आहे?" उमेदवाराने सांगितले की, त्याने पाकिस्तानी अभिनेत्री दुर-ए-फिशान सलीमचे नाव घेतले. मग त्याला विचारण्यात आले की त्या अभिनेत्रीचं तुला काय आवडतं. मुलाखत देणाऱ्याने डोळे उत्तर दिले. त्यानंतर मुलाखत घेणाऱ्याने विचारले की तुला अभिनेत्रीचं नेमकं काय आवडतं मुलाखत कार ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं मुलाला विचारलं की अभिनेत्रीच्या माने खालचा कोणता भाग आवडतो. मुलानं देखील हसून या प्रश्नाचं उत्तर हात म्हणून दिलं.

कतरिना कैफ बाबत विचारण्यात आलेला प्रश्न

काही मिनिटांनंतर खानने अब्बासला विचारले, "बॉलिवुडमधील तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे?" उमेदवार म्हणाला, "सर, कतरिना कैफ." यानंतर खान यांनी उमेदवाराला अशा परिस्थितीचे वर्णन केले ज्यामध्ये "भारत पाकिस्तानवर आण्विक हल्ल्याची योजना आखत आहे आणि आम्ही (पाकिस्तान) भारताला कसे रोखू शकतो याची माहिती कतरिना कैफकडे आहे. ही माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला तिच्याशी संबंध निर्माण करण्यास सांगितले आहे. अशा स्थितीत तू ते करशील का? या प्रश्नावर उमेदवाराने हो उत्तर दिले. "सर, साहजिकच जर देश वाचवायचा असेल तर कतरिना कैफसोबत मला संबंध ठेवावेच लागतील."

मुलाखतकाराने उमेदवाराला पुढे विचारले, "परिस्थिती तशीच आहे, पण तुम्ही अफगाणिस्तानात आहात आणि गुल खान नावाच्या व्यक्ती कडून तुला ही माहिती मिळवायची आहे तू कतरिना प्रमाणे त्या व्यक्तीशी संबंध ठेवशील का? यावर उमेदवाराने विचारले, "कसले नाते?" यानंतर खान यांनी उमेदवाराला फटकारले आणि विचारले, "हे तुझे पात्र आहे का?" त्यानंतर खान यांनी अब्बास याला त्याने मुलाखत देतांना केलेल्या चुकांचा अभिप्राय दिला व त्यांच्या उत्तरांमधील त्रुटी देखील त्याच्या निदर्शनास आणून दिल्या.

दोघांचा हा मॉक इंटरव्ह्यु सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. एक्स आणि Instagram यूझर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी खानच्या प्रश्नांची खिल्ली उडवली. पाकिस्तानमधील काही यूझर्सने आयएसएसबीची मुलाखत देण्याचा त्यांचा अनुभव देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर ८९००० पेक्षा जास्त लोकांनी पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये उमेदवार अली अब्बास पाकिस्तान मिलिटरी अकादमीच्या ११९ लाँग कोर्ससाठी मॉक इंटरव्ह्यू देत होता.