मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लाहोरमधील १२०० वर्षे जुन्या मंदिराचा होणार जिर्णोद्धार, न्यायालयीन लढ्याला यश
लाहोरमधील हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा
लाहोरमधील हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा

लाहोरमधील १२०० वर्षे जुन्या मंदिराचा होणार जिर्णोद्धार, न्यायालयीन लढ्याला यश

04 August 2022, 8:48 ISTSuraj Sadashiv Yadav

1992 मध्ये भारतात बाबरीच्या विध्वंसानंतर एका जमावाने या वाल्मिकी मंदिरावर हल्ला केला होता. मंदिराला हानी पोहोचवून आगही लावण्यात आली होती.

Hindu Temple In Pakistan: पाकिस्तानमध्ये १२०० वर्षे जुन्या एका मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयीन लढाईनंतर आता मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. या मंदिरावर एका ख्रिश्चन कुटुंबाने ताबा मिळवला होता. आता मंदिर रिकामे करण्याचे आदेश ख्रिश्चन कुटुंबाला दिले आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समुदायांच्या धार्मिक स्थळांची देखरेक करणार्या ईटीपीबीने याची माहिती दिली आहे. ईटीबीपीने गेल्या महिन्यात ख्रिश्चन कुटुंबाचा वाल्मिकी मंदिराचा ताबा काढून गेतला होता. लाहोरच्या अनारकली बाजाराजवळ हे मंदिर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लाहोरमध्ये कृष्ण मंदिराशिवाय वाल्मिकी मंदिर एकमेव मंदिर आहे जिथे लोक पूजापाठ करू शकतात. या कुटुंबावर ख्रिश्चन कुटुंबाने अतिक्रमण केलं होतं. आम्ही हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला होता. गेल्या दोन दशकांपासून त्यांच्याकडून फक्त वाल्मिकी जातीच्या हिंदूंनाच मंदिरात पूज करण्यासाठी परवानगी दिली जात होती.

ईटीपीबीचे प्रवक्ते आमिर हाश्मी यांनी सांगितले की, "येत्या काही दिवसात वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल. १०० पेक्षा अधिक हिंदू, काही शिख आणि ख्रिश्चन नेते वाल्मिकी मंदिरात गेले होते. हिंदुंनी धार्मिक विधी केले आणि पहिल्यांदा लंगर सेवन केले."

1992 मध्ये भारतात बाबरीच्या विध्वंसानंतर एका जमावाने या वाल्मिकी मंदिरावर हल्ला केला होता. मंदिराला हानी पोहोचवून आगही लावण्यात आली होती. आजुबाजुच्या दुकानांना आग लागली होती. ईटीबीपीने सांगितले की, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने एक सदस्यीय आयोग स्थापन केला होता. त्यानंतर आयोगाकडून सरकारला मंदिराच्या जीर्णोद्धाराची शिफारस करण्यात आली होती. ईटीपीबीकडून त्या शिख आणि हिंदू मंदिरांची आणि जमिनीची देखभाल करते जे फाळणीनंतर भारतात गेले. पाकिस्तानमध्ये २०० गुरुद्वारा आणि १५० मंदिरांची देखभाल करण्याची जबाबदारी ईटीपीबीवर आहे.