मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Padma Awards 2024 : पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्मश्री

Padma Awards 2024 : पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्मश्री

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 25, 2024 10:31 PM IST

Padma Award 2024 Announced : केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या देशातील ३४ गुमनाम नायकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

Padma Award 2024 Announced
Padma Award 2024 Announced

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ३४ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी ३४ व्यक्तींना पद्म श्री पुस्कार देण्याची घोषणा झाली आहे. यात पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू,सर्वेश्वर, सांगथाम सहित अनेक इतर मान्यवर व्यक्तीच्या नावांचा सामावेश आहे. महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना (Uday Deshpande) पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

 

उदय देशपांडे हे मागच्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या दादरमध्ये समर्थ व्यायाम मंदिरात मल्लखांबाचं प्रशिक्षण देत आहेत.तेआंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्लखांब प्रशिक्षकअसून त्यांनी आतापर्यंत ५० देशातील ५ हजारहून अधिक लोकांना मल्लाखांबाचं प्रशिक्षण दिलं आहे.

पारबती बरुआः पहिली महिला महावत

आराम राज्यातील पारबती बरुआ ६७ वर्षांच्या असून त्यांना सामाजिक कार्य (पशु कल्याण) विभागात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पारबती भारतातील पहिला महिला  महावत असून त्यांनी पुरुष प्रधान क्षेत्रात निपुणता मिळवत रुढीवाधी परंपरा मोडीत काढली.  मानव आणि हत्तीमध्ये संघर्षचा निपटारा करण्याचे नैपुण्य पारबतीने आपल्या वडिलांकडून मिळवले. तिने १४ वर्षाच्या कमी वयात या कामाला सुरूवात केली होती. 

जागेश्वर यादव -
जशपूरमधील आदिवासी कल्याण कार्यकर्ता जागेश्वर यादव यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. छत्तीसगडमधील ६७ वर्षीय जागेश्वर यादव यांना सामाजिक कार्य (आदिवासी - पीवीटीजी)  साठी पद्म पुरस्कार दिला जाणार आहे. 

चामी मुर्मू:  

झारखंड निवासी चामी मुर्मू (वय ५२) यांना सामाजिक कार्य (पर्यावरण - वनरोपण) मध्ये  पद्मश्री  मिळाला आहे. त्यांनी ३ हजार महिलांसोबत ३० लाखाहून अधिक वृक्षारोपण केले आहे.

 भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर पद्म पुरस्कार महत्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. पद्म पुरस्कार हा पद्म विभूषण, पद्म विभभूषण, पद्मश्री अशा तीन श्रेणीत दिला जातो.

WhatsApp channel

विभाग