Medicines Will Expensive: पेनकिलरपासून अँटिबायोटिक्सपर्यंत; येत्या १ एप्रिलपासून औषधे महागणार, कारण काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Medicines Will Expensive: पेनकिलरपासून अँटिबायोटिक्सपर्यंत; येत्या १ एप्रिलपासून औषधे महागणार, कारण काय?

Medicines Will Expensive: पेनकिलरपासून अँटिबायोटिक्सपर्यंत; येत्या १ एप्रिलपासून औषधे महागणार, कारण काय?

Mar 15, 2024 11:18 AM IST

Medicines Will Expensive from 01 April: सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढणार असून येत्या १ एप्रिलपासून ८०० औषधे महाग होणार आहेत.

Medicines
Medicines

Medicines Rates News: आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढणार आहे. अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना येत्या १ एप्रिलपासून औषधे महागणार आहेत, ज्यात पेनकिलर्सपासून अँटिबायोटिक्स यांसारख्या ८०० औषधांचा समावेश आहे. अशा स्थितीत अ‍ॅनुअल होलसेल प्राइज इंडेक्समधील बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना त्यांच्या किंमती वाढवण्याची परवानगी देण्यासाठी सरकार तयार आहे. वाढत्या महागाईमुळे औषधांच्या किंमती वाढवण्याची मागणी केली जात होती.

ज्या औषधांचा आवश्यक यादीत समावेश केला जातो, ते बहुतेक लोकांसाठी उपयुक्त असते. या औषधांच्या किंमती सरकार ठरवते, ज्यात अँटी कॅन्सरसारख्या औषधांचा समावेश असतो. कंपनी अशा औषधांच्या किंमतीत वर्षभरात १० टक्क्यांनी वाढ करू शकते.

कोणत्या औषधांचे दर वाढतील?

पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, ॲनिमिया, जीवनसत्त्वे आणि खनिजे औषधांच्या किंमती वाढणार आहेत. कोविड-१९ च्या मध्यम ते गंभीर आजारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी काही औषधे आणि स्टिरॉइड्स देखील या यादीत आहेत.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून खुशखबर!

 

दर वाढण्यामागचे कारण

गेल्या काही वर्षांमध्ये काही महत्त्वाच्या औषधांचे दर १५ ते १३० टक्के यांच्या दरम्यान आहेत. पॅरासिटामॉलच्या किमतीत १३० टक्के आणि एक्सिपियंट्सच्या किंमती १८- २६२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकॉलसह सॉल्व्हेंट्स, सिरप अनुक्रमे २६३ टक्के आणि ८३ टक्क्यांनी महाग झाले आहेत. इंटरमीडिएट्सच्या किंमती ११ ते १७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पेनिसिलिन जी १७५ टक्क्यांनी महाग झाली. भारतीय औषध उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लॉबी गटानेही सरकारला सर्व विहित फॉर्म्युलेशनच्या किमतींमध्ये १० टक्क्याने वाढ करण्याची विनंती केली होती.तसेच नॉन शेड्यूल औषधांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ करण्याची मागणी केली होती.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर